हिमाचल प्रदेश: Himachal Chakki Railway Bridge: पंजाबला हिमाचलशी जोडणारा कंडवाल (Kandwal) येथील चक्की नदीवर बांधलेला रेल्वे पूल वाहून गेला आहे. शनिवारी सकाळी अचानक पुलाचा पिलर आणि दोन स्पॅम पडल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे.
कांगडा जिल्ह्यात पावसामुळे नूरपूरजवळील चक्की नदीत इंग्रजांनी बांधलेला रेल्वे पूल वाहून गेला. चक्की नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं आजूबाजूचे लोक पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान अचानक पुलाला तडा गेला आणि पुलाचा काही भाग कोसळला. पूल पडल्याने कांगडा व्हॅली रेल्वे संपर्कही पूर्णपणे तुटला आहे. मात्र सुदैवानं गेल्या महिन्यापूर्वीच रेल्वे विभागानं पठाणकोट ते जोगेंद्रनगर ट्रॅकपर्यंत जाणारे मार्ग पावसामुळे बंद केले होते. कारण रेल्वे पथकाने हा पूल असुरक्षित घोषित करण्यात आला आहे.
अधिक वाचा- मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?, पाकमधून आलेल्या धमकीनं खळबळ
पूल कोसळण्याचं कारण आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे पूल कोसळण्याचे मुख्य कारण अवैध उत्खनन असल्याचं बोललं जात आहे. खाण माफियांनी पुलाच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूने बेकायदा उत्खनन करून चक्की नदीचा प्रवाह आवळला आहे. नदी ज्या पूर्वी मीटरनं वाहत होती, ती आता आकुंचन पावली आहे. पुलाजवळ अशी परिस्थिती आहे की येथे प्रवाह केवळ 12-15 मीटर आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.
#WATCH | Himachal Pradesh: The railway bridge on Chakki river in Himachal Pradesh's Kangra district damaged due to flash flood, and collapsed today morning. The water in the river is yet to recede: Northern Railways pic.twitter.com/ApmVkwAkB8 — ANI (@ANI) August 20, 2022
चंबा जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंडी जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरले, काही गावकरी तेथे अडकले. यात अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालं आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. चंबा जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन केंद्र (DEOC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 4.30 वाजता चौवारी तहसीलच्या बनेत गावात भूस्खलन झाले. त्यानंतर एक घर कोसळले.
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं 25 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे भूस्खलनाचा इशारा दिला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगडा, चंबा, मंडी, कुल्लू, शिमला, सिरमौर, सोलन, हमीरपूर, उना आणि बिलासपूर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस पाऊस सुरू राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.