देशभर पावसाचा प्रकोप, अनेक राज्यांमध्ये अलर्ट

शेकडो लोक पूराच्या तडाख्यात सापडले आहेत. सैन्यदले आणि एनडीआरएफ बचत कार्य करत आहेत. तामिळनाडूमध्येदेखील परिस्थिती गंभीर आहे. तर उत्तराखंड येथे मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Heavy rainfall
पावसाचा हाहाकार 
थोडं पण कामाचं
  • अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) परिस्थिती गंभीर
  • केरळमध्ये पावसाचा प्रकोप, अनेकांचा मृत्यू
  • देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जाहीर

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) परिस्थिती गंभीर झाली आहे. केरळमध्ये (Kerala)अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलन यामुळे मरणाऱ्यांची संख्या २१ वर पोचली आहे. अनेकजण जखमी झाले आहेत तर अनेक बेपत्ता आहेत. शेकडो लोक पूराच्या तडाख्यात सापडले आहेत. सैन्यदले आणि एनडीआरएफ बचत कार्य करत आहेत. तामिळनाडूमध्येदेखील परिस्थिती गंभीर आहे. तर उत्तराखंड येथे मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rainfall disrupts the country, alert in many states)

केरळमध्ये स्थिती गंभीर

केरळच्या कोट्टयम जिल्हायत १२ मृतदेह हाती लागले आहेत. पाच लोक अद्याप बेपत्ता आहेत. डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहेत. अनेक गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. केरळमध्ये मदतीसाठी शिबिरे बनवण्यात आली आहेत. केरळमध्ये १८ ऑक्टोबरपासून होणारी उच्च माध्यमिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. हवामान विभागाने केरळच्या ११ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

कर्नाटक आणि तामिळनाडूत अलर्ट

कर्नाटक आणि तामिळनाडूतदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळेच सोमवारी शाळा, कालेज बंद ठेवण्यात आले आहेत. दक्षिण तामिळनाडूत सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागातील काही जिल्ह्यात पूर आला आहे. दक्षिण तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये विक्रमी पाऊस पडतो आहे. २०१९ आणि २०२० तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे.

बंगालमध्ये मुसळधार पावसाची भीती

बंगालमध्येदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. २० ऑक्टोबरपर्यत बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी पूराची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर तेलंगणामध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

उत्तरेत पावसाचा हाहाकार

दिल्लीमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पावसामुळे धान्याचे नुकसान झाले आहे. शेतातील पीक आडवे झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विविध पीके पाण्याखाली गेली आहेत किंवा आडवी झाली आहेत. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हिमाचलप्रदेशात हिमवर्षाव आणि पावसामुळे तापमान तीन ते दहा अंशाने घसरले आहेत. रोहतांग, बारालाचा, शिंकुलासह इतर भागात हिमवर्षाव झाल्याने थंडी वाढली आहे. तर अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सोमवारी राज्यातील १० जिल्ह्यात मुसळधार आणि वादळी पावसाचा अलर्ट  जाहीर करण्यात आला आहेत.

महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी