चीन: हेनान प्रांतात अतिमुसळधार पाऊस, प्रशासन धास्तावले

चीनच्या हेनान प्रांतात अतिमुसळधार पाऊस पडला. उपलब्ध नोंदींनुसार हा हेनान प्रांतात आतापर्यंत झालेला सर्वाधिक पाऊस आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. मागील एक हजार वर्षांत हेनान प्रांतात असा पाऊस झाल्याची नोंद नाही.

Heavy rains and floods in China after 1000 years see how iPhone City submerged
चीन: हेनान प्रांतात अतिमुसळधार पाऊस, प्रशासन धास्तावले 

थोडं पण कामाचं

  • चीन: हेनान प्रांतात अतिमुसळधार पाऊस, प्रशासन धास्तावले
  • हेनान प्रांतात आतापर्यंत झालेला सर्वाधिक पाऊस
  • मागील एक हजार वर्षांत हेनान प्रांतात असा पाऊस झाल्याची नोंद नाही

हेनान: चीनच्या हेनान प्रांतात अतिमुसळधार पाऊस पडला. उपलब्ध नोंदींनुसार हा हेनान प्रांतात आतापर्यंत झालेला सर्वाधिक पाऊस आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. मागील एक हजार वर्षांत हेनान प्रांतात असा पाऊस झाल्याची नोंद नाही. 

बापरे ! चीनने बनवला नवीन सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा आहे दहा पट जास्त शक्तीशाली

चीन हवामान बदल करुन भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात

अतिमुसळधार पावसामुळे हेनान प्रांतातील जनजीवन विस्कळीत झाले. आतापर्यंत १३ मृतदेह हाती आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पावसाचा तडाखा बसल्यामुळे हेनान प्रांतात पूर आला आहे. लाखो नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हेनान प्रांताची राजधानी असलेल्या झेंगझोऊ शहरातील सर्व सखल भागांमध्ये तसेच टनेलमध्ये पाणी भरले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच मदतकार्यासाठी चिनी सैन्याची मदत घेतली जात आहे. हेनान प्रांतातील यिचुआन येथे असलेला एक मोठा बांध कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. बांधाच्या भिंतीला २० मीटर लांबीचा मोठा तडा गेला आहे. तसेच आणखी काही बांधांच्या भिंतींना लहान-मोठे तडे गेले आहेत.

पावसाचा एवढा मोठा तडाखा बसल्यामुळे प्रशासन धास्तावले आहे. हेनान प्रांतातील झेंग्झो शहरात जगातील सर्वात मोठा आयफोन निर्मिती प्रकल्प आहे. पण पावसामुळे झेंग्झो शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयफोन निर्मिती प्रकल्पातील कामावर परिणाम झाला आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. संपूर्ण हेनान प्रांतात अनेक ठिकाणी सबवेमध्ये मानेच्या उंचीपर्यंत पाणी आले आहे. एवढी पाणी आल्यामुळे नागरिक घाबरले आहेत. अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. संपूर्ण हेनान प्रांतातील सार्वजनिक बस वाहतूक कोलमडली आहे.

अनेक टनेलमध्ये पाणी भरल्यामुळे हेनान प्रांतातील ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत आणि अनेक ट्रेन आहेत त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत. रस्ते, सबवे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक कोलमडली आहे. झेंगझोऊमध्ये मंगळवारी २४ तासांत ४५७.५ मिमी पाऊस झाला. उपलब्ध नोंदींनुसार झेंगझोऊमध्ये आतापर्यंत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

झेंगझोऊ विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या २६० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. काही विमानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसामुळे हेनान प्रांतात अनेक ठिकाणी वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दूरसंचार आणि इंटरनेट सेवा ठप्प आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी