Helicopters Collide in Australia : गोल्डकोस्ट : दोन हेलिकॉप्टरची हवेत समोरासमोर धडक (Helicopters Collide) झाल्याने चौघाचा मृत्यू झाला. तर इतर काही लोक गंभीर जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट पर्यटन स्थळावर (Gold Coast Tourist Destination )घडला. (helicopters collide in mid air in australia watch video of gold coast tourist destination)
दोन हेलिकॉप्टरची हवेत समोरासमोर धडक (Helicopters Collide) झाल्याने चौघाचा मृत्यू झाला. तर इतर काही लोक गंभीर जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट पर्यटन स्थळावर (Gold Coast Tourist Destination )घडला. अपघातानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलीकॉप्टरचे अवशेष जमीनीवर विखुरले होते.
अपघात झाल्यावर दोन्ही हेलिकॉप्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी कोसळली. त्यातील एक हेलिकॉप्टर समुद्रकिनारी काही अंतरावर बेचिराक होऊन पडले. तर दुसरे हेलिकॉप्टर पहिल्याच्या तुलनेत बऱ्यापैकरी सुस्थितीत अवस्थे लोकप्रिय सी वर्ल्ड मरीन थीम पार्कजवळ कोसळले.
हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाने त्यांच्या बजावासाठी इतर काही हेलिकॉप्टर्स रवाना केली. तसेच, इतर मदतही पुरवली . मात्र त्याचा फायदा झाला नाही. क्वीन्सलँड पोलिस सेवेचे कार्यवाहक निरीक्षक गॅरी वॉरेल यांनी घटनास्थळी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "ती दोन विमाने, जेव्हा टक्कर झाली, तेव्हा ते सी वर्ल्ड रिसॉर्टपासून अगदी दूर वाळूच्या किनाऱ्यावर क्रॅश लँड झाले आणि उतरले. यात चौघांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियाच्या विमान विभागाने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरु केली आहे.