कर्नाटकच्या विधानसभेत सावरकरांचे तैलचित्र, काँग्रेस नाराज

High drama in Karnataka over Savarkar poster : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र (पोट्रेट) कर्नाटकच्या विधानसभेत लावण्यात आले.

High drama in Karnataka over Savarkar poster
कर्नाटकच्या विधानसभेत सावरकरांचे तैलचित्र, काँग्रेस नाराज  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कर्नाटकच्या विधानसभेत सावरकरांचे तैलचित्र, काँग्रेस नाराज
  • काँग्रेसच्या वर्तनावर भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची खोचक टिप्पणी
  • सिद्धरामय्या यांना विचारा तैलचित्र (पोट्रेट) कोणाचे लावायचे ते...  दाऊद इब्राहिमचे तैलचित्र (पोट्रेट) लावायचे आहे का?

High drama in Karnataka over Savarkar poster : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र (पोट्रेट) कर्नाटकच्या विधानसभेत लावण्यात आले. कर्नाटकमधील भाजप सरकारने निर्णय घेतल्यानंतर सावरकरांचे तैलचित्र (पोट्रेट) विधानसभेत महापुरुषांचे तैलचित्र (पोट्रेट) ज्या ठिकाणी लावले जातात तिथेच सन्मानाने लावण्यात आले. पण या घटनेमुळे राज्यात विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. 

सावरकरांचे तैलचित्र (पोट्रेट) विधानसभेत लावले म्हणून काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केले. कामकाज करण्यासाठी विधानसभेत बसण्याऐवजी काँग्रेसचे सर्व आमदार विधान सौधच्या (विधीमंडळाची इमारत) पायऱ्यांवर जाऊन बसले. तिथे बसून काँग्रेस आमदारांनी आंदोलन सुरू केले. विधानसभेत वाल्मीकि बसवण्णा, कनक दास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे फोटो किंवा तैलचित्र (पोट्रेट) लावा अशी मागणी काँग्रेसने केली. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये सत्तेत असताना वाल्मीकि बसवण्णा, कनक दास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे फोटो किंवा तैलचित्र (पोट्रेट) विधानसभेत लावण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला नाही.

काँग्रेसच्या वर्तनावर भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खोचक टिप्पणी केली. वैचारिक मतभेद असू शकतात, पण सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. सिद्धरामय्या यांना विचारा तैलचित्र (पोट्रेट) कोणाचे लावायचे ते...  दाऊद इब्राहिमचे तैलचित्र (पोट्रेट) लावायचे आहे का? असे जोशी म्हणाले. 

लांडोर खरंच अश्रू पिवून गर्भवती होते? गुगलवर आहेत वेगवेगळी उत्तरे; काय आहे सत्य जाणून घ्या

Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत राहत असलेल्या फ्लॅटची नागरिकांना वाटते भिती, मालकाला आलं टेन्शन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी