200 मीटर दरीत कोसळली बस; 16 जणांचा मृत्यू, बसमध्ये होते शाळकरी मुलं

Kullu Accident: कुल्लूमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सैंज दरीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Major accident in Himachal
हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सैंज दरीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली.
  • या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
  • तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सैंज दरीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बसच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. ही बस सैंज खोऱ्यातील शेंशर येथून सैंजच्या दिशेनं येत होती. त्याचवेळी जंगला नावाच्या ठिकाणी असलेल्या वळणावर ही बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या खाली असलेल्या दरी जाऊन पडली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

बसमध्ये होते शाळकरी मुलं

सैंज शाळेच्या दिशेने येणाऱ्या या बसमध्ये स्थानिक लोकांव्यतिरिक्त शाळकरी मुलंही प्रवास करत होते. या बसमध्ये किती लोक होते, याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती नाही. एसपी कुलू गुरदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या अपघाताची माहिती मिळाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, हिंगोलीतल्या आमदारानं सोडली शिवसेनेची साथ; शिंदे गटात दाखल

कसा घडला अपघात 

गेल्या दोन दिवसांपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खूपच खराब आहे. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुल्लू जिल्ह्यातील निओली-शंशेर रस्त्यावर खासगी बसचे नियंत्रण सुटले आणि सैंज खोऱ्याच्या जंगला परिसरात 200 मीटर खोल दरीत कोसळली. बसचा चक्काचूर झाला. अपघात स्थळ जिल्हा मुख्यालयापासून 65 किमी अंतरावर आहे.

पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या वेळी माझ्या शोकसंवेदना कुटुंबांसोबत आहेत.

मला आशा आहे की जखमी लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. पंतप्रधानांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी