Himachal Pradesh Exit Poll 2022: हिमाचल प्रदेशात पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेस सत्ता मिळवणार? वाचा काय आहे अंदाज

Himachal Pradesh Assembly Election 2022 Exit Poll: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप बाजी मारणार की काँग्रेस सत्ता मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Himachal Pradesh election 2022 times now etg exit poll bjp will get majority read in marathi
Himachal Pradesh Exit Poll 2022: हिमाचल प्रदेशात पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की काँग्रेस सत्ता मिळवणार? 

Himachal Pradesh election exit poll: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध चॅनल्स आणि एजन्सीने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. टाइम्स नाऊ आणि इटीजी यांच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीनुसार, निकालाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि इटीजीच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसताना दिसत आहे तर आम आदमी पक्षाचा सुपडा साफ होणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Himachal Pradesh election 2022 times now etg exit poll bjp will get majority read in marathi)

टाइम्स नाऊ आणि इटीजीच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशात भाजपला 34-42 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या खात्यात 24 ते 32 जागा जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा : या सवयींमुळे होऊ शकतो मूळव्याध, आजच बदला अन्यथा...

कोणत्या पक्षाला किती जागा?

  1. भाजप - 34 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज
  2. काँग्रेस - 24 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज
  3. आम आदमी पार्टी - 0 जागा मिळण्याचा अंदाज
  4. इतर - 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज

हा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. आता निवडणुकीच्या निकालात नेमकं काय होतं आणि कोण बाजी मारतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे पण वाचा : नववर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग, या राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

वोट शेअर (कोणत्या पक्षाला किती टक्के मते?) 

  1. भाजप - 45.1 %
  2. काँग्रेस - 40.9 %
  3. आम आदमी पार्टी - 5.3 %
  4. इतर - 8.7 % 

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे सर्व रेकॉर्ड तोडण्यात आले. निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक 75.6 टक्के मतदान झालं. हिमाचल प्रदेशात परंपरागत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढाई आहे मात्र, यावेळी आम आदमी पार्टीने निवडणुकीत आपली ताकद लावली. 

भाजपची सत्ता आली तर....

हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्रिपदासाठी जयराम ठाकूर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याची घोषणा केली होती. मात्र, काँग्रेसची सत्ता आली तर या ठिकाणी मुख्यमंत्रिपदासाठी कोणता चेहरा असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.

Poll of Polls काय?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी