कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर

Hindu temple like structure found during renovation of mosque near Mangaluru in Karnataka : कर्नाटकमधील मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत हिंदू मंदिराचे अस्तित्व आढळले आहे. जशी हिंदू मंदिराची वास्तू रचना असते तशाच स्वरुपाची रचना मशिदीच्या आत आढळली आहे.

Hindu temple like structure found during renovation of mosque near Mangaluru in Karnataka
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर 
थोडं पण कामाचं
  • कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर
  • जशी हिंदू मंदिराची वास्तू रचना असते तशाच स्वरुपाची रचना मशिदीच्या आत आढळली
  • दक्षिण कन्नड आयुक्तालयाने मशिदीच्या डागडुजीच्या कामाला स्थगिती दिली

Hindu temple like structure found during renovation of mosque near Mangaluru in Karnataka : मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत हिंदू मंदिराचे अस्तित्व आढळले आहे. जशी हिंदू मंदिराची वास्तू रचना असते तशाच स्वरुपाची रचना मशिदीच्या आत आढळली आहे. यामुळे मशिदीच्या ठिकाणी आधी हिंदू मंदिर होते अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

विश्व हिंदू परिषदेने जिल्हा प्रशासनाला मशिदीत सुरू असलेले डागडुजीचे काम स्थगित करुन वास्तूची तज्ज्ञांमार्फत तपासणी करावी अशी मागणी केली आहे. मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अस्तित्व होते की नव्हते आणि मंदिराची मोडतोड करुन तिथेच मशिद बांधण्यात आली आहे की नाही याची तपासणी करा. तज्ज्ञांचा अहवाल येऊ दे; असे विश्व हिंदू परिषदेने जिल्हा प्रशासनाला सांगितले.

दक्षिण कन्नड आयुक्तालयाने डागडुजीचे काम स्थगित केले आहे. तज्ज्ञ समितीची नियुक्ती करुन तपासणी करणार असल्याचे आयुक्तालयाने प्रसारमाध्यमांना सांगितले. नागरिकांनी शांतता राखून कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन दक्षिण कन्नड आयुक्तालयाने केले आहे. 

आम्ही कागदपत्रांची छाननी करत आहोत. तसेच तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी सुरू आहे. वास्तू विषयीचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, असे दक्षिण कन्नड उपायुक्त राजेंद्र केवी म्हणाले. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी