पूर्वज हिंदू होते, बकरी ईदला गायीचा बळी देणार नाही; म्हणाले खासदार अजमल

Hindus Our Forefathers, Sacrifice other animals not cow on Bakrid says Assam MP Badruddin Ajmal to Muslim community : आमचे पूर्वज हिंदू होते त्यामुळे बकरी ईदच्या (ईद-उल-अधा) दिवशी गायीचा बळी देणार नाही. इतर प्राण्यांचे बळी देऊ पण गायीचा बळी देणार नाही; असे आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल म्हणाले.

Badruddin Ajmal
पूर्वज हिंदू होते; म्हणाले खासदार अजमल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पूर्वज हिंदू होते; म्हणाले खासदार अजमल
  • बकरी ईदला गायीचा बळी देणार नाही; म्हणाले खासदार अजमल
  • बकरी ईदच्या दिवशी इतर प्राण्यांचे बळी द्या पण गायीचा बळी देऊ नका, असे आवाहन आसाममधील मुस्लिम समाजाला केले

Hindus Our Forefathers, Sacrifice other animals not cow on Bakrid says Assam MP Badruddin Ajmal to Muslim community : आमचे पूर्वज हिंदू होते त्यामुळे बकरी ईदच्या (ईद-उल-अधा) दिवशी गायीचा बळी देणार नाही. इतर प्राण्यांचे बळी देऊ पण गायीचा बळी देणार नाही; असे आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल म्हणाले. त्यांनी बकरी ईदच्या दिवशी इतर प्राण्यांचे बळी द्या पण गायीचा बळी देऊ नका, असे आवाहन आसाममधील मुस्लिम समाजाला केले आहे. 

लोकसभेचे सदस्य असलेले मौलाना बदरुद्दीन अजमल हे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख आणि आसाममधील जमीयत उलमाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही सदस्य भारतात हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात एकता आहे. ही एकता कोणीही तोडू शकत नाही, असे मौलाना बदरुद्दीन अजमल म्हणाले. 

आम्ही इतरांच्या धर्माचा आणि संस्कृतीचा आदर करतो त्यामुळे बकरी ईदच्या (ईद-उल-अधा) दिवशी गायीचा बळी देणार नाही अशा स्वरुपाचे वक्तव्य मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.

हिंदू सनातन धर्म गायीला माता मानतो आणि तिची पूजा करतो. आपण हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का बसेल असे वर्तन करू नये; अशा स्वरुपाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी एका कार्यक्रमात केले होते. याआधी २००८ मध्ये इस्लामी मदरसे दारुल उलूम देवबंदने बकरी ईदच्या (ईद-उल-अधा) दिवशी गायीचा बळी देऊ नये अशा स्वरुपाचे आवाहन केले होते. 

धार्मिक ग्रंथात कुठेही गायीचा बळी द्या किंवा गायीचा बळी द्यायला पाहिजे अशा स्वरुपाचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही; त्यामुळे बकरी ईदच्या (ईद-उल-अधा) दिवशी गायीचा बळी देऊ नये, असे इस्लामी मदरसे दारुल उलूम देवबंदने सांगितले होते.

नुपुर शर्माचे समर्थन करणाऱ्यांचा शिरच्छेद करण्याच्या दोन घटना भारतात घडल्या आहेत. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात आणि राजस्थानमध्ये उदयपूर येथे घटना घडल्या आहेत. या संदर्भात विचारले असताना मुस्लिमांना अशा प्रतिक्रिया देऊ नये; असे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी