Rahul Gandhi : नवी दिल्ली : आज महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी आहे. या दिवशी राहुल गांधी यांच्य ट्विटमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. एका हिंदुत्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. तसेच सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटतं की गांधी सध्या हयात नाही, परंतु जिथे सत्य आहे तिथे आजही बापू जिवंत आहेत असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्यांचा हिंदुत्ववादावर विश्वास आहे ते कुणाच्याही समोर झुकतात अशी टीका राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात केली होती. ज्यांच्या हिंदुत्वावर विश्वास आहे ते इंग्रजांसमोर झुकायचे आणि ते पैश्यांसाठी झुकायचे, अशी राहुल गांधी म्हणाले होते. (hindutvavadi shot mahatma gandhi rahul gandhi tweet on mahatma gandhi death anniversary )
एक हिंदुत्ववादी ने गाँधी जी को गोली मारी थी। — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 30, 2022
सब हिंदुत्ववादियों को लगता है कि गाँधी जी नहीं रहे।
जहाँ सत्य है, वहाँ आज भी बापू ज़िंदा हैं!#GandhiForever pic.twitter.com/nROySYZ6jU
भारतीय स्वातंत्र्य लढ्याती अग्रगण्य नेते मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालून ठार केले होते. सध्या संपूर्ण देश त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना श्रध्दांजली वाहत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहिली आहे.
“When I despair, I remember that all through history the way of truth and love have always won. There have been tyrants and murderers, and for a time they can seem invincible but in the end, they always fall. Think of it always.” — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 30, 2022
- Mahatma Gandhi pic.twitter.com/3EOG59IljW
नेताजी सुभाषाचंद्र बोस यांनी ६ जुलै १९४४ रोजी रंगून रेडियो वरून एक भाषण दिले होते. तेव्हा नेताजी यांनी बापूंचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. नेताजी यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करताना महात्मा गांधी यांचा आशिर्वाद मागितला होता. बोस यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, आमचे राष्ट्र्पिता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपला आशिर्वाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
गांधी दक्षिण आफ्रिकेहून इंग्लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस कायमचे भारतात परत आले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. त्यानंतर अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला.