International Men’s Day: सर्वप्रथम कधी साजरा झाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन? वाचा इतिहास आणि महत्त्व

पुरुषांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी साजरा होतो. या जगातील पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, कुटुंब व्यवस्थेतील पुरुषांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण करणे यासारख्या अनेक उद्देशांसाठी 'इंटरनॅशनल मेन्स डे' साजरा होतो.

International Men’s Day
सर्वप्रथम कधी साजरा झाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुरुषांच्या अधिकार आणि हक्कांसाठी साजरा होतो ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’
  • वेस्ट इंडिजमधील एका प्राध्यापकांनी रोवली संकल्पनेची मुहूर्तमेढ
  • भारतात 2007 सालापासून साजरा होऊ लागला दिवस

International Men’s Day: या जगात महिला (Women) आणि पुरुष (Men) या दोघांचाही स्वतंत्र आणि तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या समाजरथाची ही दोन्ही चाकं असून यातील कुठल्याही एका घटकाशिवाय या जगाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जगभरात महिला दिन (Women’s day) साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पुरुषांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men’s day) दरवर्षी 19 नोव्हेंबर (19 Nov) या दिवशी साजरा होतो. या जगातील पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, कुटुंब व्यवस्थेतील पुरुषांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण करणे यासारख्या अनेक उद्देशांसाठी 'इंटरनॅशनल मेन्स डे' साजरा होतो.

हा आहे उद्देश

समाजात पुरुषांना त्यांचे अधिकार मिळवून देणे आणि आपल्या अधिकाराप्रती त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आजच्या दिवसामागचा प्रमुख उद्देश. महिलांप्रमाणेच पुरुषांवरही जगात अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत असतात. पुरुषांसोबत होणारे भेदभाव, त्यांचं होणारं शोषण आणि हिंसा या विरोधात आवाज उठवणे आणि पुरुषांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती देणं, हे देखील पुरुष दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यामागील उद्देश आहेत. आपल्या समाजात अनेक ठिकाणी पुरुषांवर अत्याचार होत असतात मात्र त्याकडे तितक्या प्रकर्षाने लक्ष वेधलं जात नाही. विशेषतः महिला आणि इतर घटकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात अनेक पुरुष शांत राहतात. अशा पुरुषांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं आणि कायद्याने मिळणाऱ्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम आजच्या दिवशी केलं जाणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे, हा देखील या दिवसामागचा एक उद्देश आहे.

अधिक वाचा - Savarkar Controversy: एका महिलेसाठी नेहरुंनी केली देशाची फाळणी, रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप

'आंतरराष्ट्रीय पुरुष दिना'ची थीम

दरवर्षी एक थीम घेऊन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा होतो. गेल्या वर्षी पुरुष आणि स्त्रियांमधील संबंध अधिक दृढ होणे, ही थीम घेण्यात आली होती. तर पुरुषांची आणि मुलांची मदत करणे, ही यंदाची थीम आहे. जागतिक पातळीवर पुरुष आणि मुलं यांच्या कल्याणासाठी सर्व त्या उपाययोजना करणे यामध्ये अपेक्षित आहे.

अधिक वाचा - श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब

'आंतरराष्ट्रीय पुरुष दिना'चा इतिहास

1999 मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला होता. वेस्टइंडीजच्या विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तिलक सिंह यांनी आपल्या वडिलांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला. याच दिवसाचा निमित्त साधन त्यांनी सर्व पुरुषांना आपल्या मनातील भावना निर्धास्तपणे व्यक्त करण्याचं आवाहन केलं होतं. त्याचप्रमाणे पुरुष म्हणून स्वतःच असणारे सकारात्मक पैलू समोर आणण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यानंतर जगभरात या दिवशी 'इंटरनॅशनल मेन्स डे' साजरा होऊ लागला. भारतात हा दिवस सर्वप्रथम 19 नोव्हेंबर 2007 या दिवशी साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी