World Labour Day 2022 in Marathi : भारतातील कामगार दिनाला आहे ९९ वर्षांचा इतिहास, वाचा कामगार दिनाचा रंजक इतिहास

भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. त्याचा इतिहासही रंजक आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली. 

labor day 2022
जागतिक कामगार दिन २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे.
  • त्याचा इतिहासही रंजक आहे.
  • आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे.

World Labour Day 2022 in marathi  :  मुंबई : भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. त्याचा इतिहासही रंजक आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली.  (history of International Workers' Day old history of 93 years  importance and significance )

अधिक वाचा : आज जागतिक कामगार दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा

कामगार दिनाचा इतिहास पॅरिस आणि अमेरिकेतून सुरू होते. साधारण १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार आपल्या न्याय मागण्यांसाठी एकवटला होता. औद्योगिक क्रांती जोरात होती. यंत्र वापरून उत्पादन होत होती. असे असले तरी कामगावरं अन्याय आणि त्यांचे शोषण सुरूच होते. कामगारांना कमी मोबदल्यात भांडवलदार तब्बल १२-१२ तास राबवत होते.

अधिक वाचा : जागतिक कामगारानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा

अमेरिकेच्या कामगार संघटनांनी कामाचे तास १२ ऐवजी ८ तास असावे अशी मागणी केली होती. त्यासाठी  १ मे १८८६ रोजी कामगारांनी संपही पुकारला होता. त्यानंतर १८८९ मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी समाजवादी काँग्रेसने कामांचे तास ८ तास असावे अशी मागणी केली होती. या मागणीमुळे कामगार दिनाला आंतरराष्ट्रीय रुप प्राप्त झाले. १८८६ साली झालेल्या संपात एक स्फोट झाला आणि त्यात पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात ७ कामगारांचा मृत्यू झाला. नंतर या रक्तरंजित लढ्याला आणखी धार आली. कामगारांनी आपल्या मागणीसाठी आणखी लढा द्यावा लागा आणि अखेर त्यांचे कामाचे तास १२ वरून ८ करण्यात आले.

अधिक वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा

भारतात १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला. हा कामगार दिन तेव्हाच्या मद्रास प्रांतात म्हणजेच आजच्या तमिळनाडूत हिंदुस्थान शेतकरी मजूर पक्षाने साजरा केला. पक्षाचे नेते सिंगरवेलु चितियार यांनी मद्रासमध्ये दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला. मद्रास उच्च न्यायालयासमोर आणि त्रिपिलकेन समुद्राच्या चौपाटीवर लाल झेंड्यासोबत भारतात प्रथम कामगार दिन साजरा करण्यात आला. तमिळनाडू सरकारने या दिवसाच्या स्मरणार्थ एक स्मारकही उभे केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी