तेवीस वर्षांच्या जोशुआ वॉन्गने बलाढ्य चीनला हादरवून टाकले!

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 19:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hong Kong Protest: जगात अनेक देशांकडे डोळे मोठे करू पाहणाऱ्या चीन विरोधात हाँगकाँगमध्ये आंदोलन सुरू आहे जगाचं लक्ष या आंदोलनाकडं लागलं आहे. अवघ्या २३ वर्षांच्या जोशुआ वॉन्गनं ही आंदोलनाची ठिणगी पेटवलीय.

joshua wong
चीनला धडकी भरवणारा जोशुआ वॉन्ग  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • हाँगकाँगमध्ये तरुणांनी छेडले ऐतिहासिक आंदोलन; लाखो तरुण उतरले रस्त्यांवर
  • हाँगकाँगच्या आंदोलनाचे जगभरातील बाजारपेठेवर पडसाद; हवाई सेवा बंद
  • अवघ्या २३ वर्षांच्या जोशुआ वॉन्ग या तरुणांने चीनला घ्यावी लावली माघार

हाँगकाँग: एखाद्या देशाचं भवितव्य कोण बदलू शकतं तर तो त्या देशातील तरुण बदलू शकतो, असं म्हटलं जातं. आजवर जगभरात कोणत्याही देशात सत्तेच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस कोणी केलं असले तर ते तेथील तरुणांनी केलंय. अशा आंदोलनांमध्ये तरुणांनीच पुढाकार घेऊन आंदोलनाची सूत्रं हाती घेतल्याची उदाहरणं जगानं पाहिली आहेत. असंच एक आंदोलन सध्या हाँगकाँगमध्ये सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांवर दिसू लागले आहेत. आंदोलनामुळे भांडवली बाजाराने सावध पवित्रा घेतला आहे.

जगात अनेक देशांकडे डोळे मोठे करू पाहणाऱ्या चीनी हुकूमशाही विरोधात हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष या आंदोलनाकडं लागलं आहे. विशेष म्हणजे चीनसारख्या अवाढव्य सत्तेला आव्हान देणारी संघटना फार मोठी नाही. तर, एक शिडशिडीत तरुण आहे. त्या तरुणाचे नाव जोशुआ वॉन्ग असून, त्याचं वय केवळ २३ वर्षे आहे. ज्या वयात स्वतःचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो त्या वयात वॉन्ग चीनसारख्या बलाढ्य शक्तीला आव्हान देत आहे.

आंदोलनाचे कारण काय?

हाँगकाँग सरकार एक नवीन विधेयक घेऊन आले आहे. या नव्या विधेयकानुसार जर, हाँगकाँगमध्ये आंदोलन केले तर, त्या आंदोलनकर्त्यांना चीनमध्ये घेऊन जाण्यात येईल आणि तेथे त्यांच्यावर खटला चालवला जाईल. या कायद्यातून चीन सरकार हाँगकाँगमधील लोकांचा आंदोलन करण्याचा अधिकारच हिंसकावून घेत आहे. त्यामुळे जोशुआ वॉन्ग याने आपल्या समर्थकांना घेऊन रस्त्यांवर आंदोलन सुरू केले. त्याला व्यापक स्वरूप आले आणि आता या आंदोलनाची झळ जगाला बसू लागली आहे.

जोशुआ वॉन्गच्या साथीने हाँगकाँगच्या रस्त्यांवर नागरिक मोठ्या संख्येने उतरले आहेत. त्यानंतर हाँगकाँगला जाणाऱ्या सगळ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. भारतातूनही हाँगकाँगची हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. हाँगकाँग हा चीनचा भाग असूनही तो स्वतंत्र प्रशासकीय भाग आहे. आंदोलकांच्या मते चीन हे विधेयक लादून हाँगकाँगमधील त्यांचा हस्तक्षेप वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आंदोलनाची तीव्रता पाहून प्रशासनाने विधेयक मागे घेतले असले तरी, आता आंदोलन सुरू आहे. आता आंदोलकांनी हाँगकाँगला लोकशाही बहाल करण्याची मागणी केली आहे.

तरुणांची फौज

हाँगकाँगमधील आंदोलनामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, आंदोलनात २० ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या खूप मोठी आहे. वॉन्गच्या संघटनेचे नाव 'डोमेसिस्टो' आहे. इतर प्रमुख नेत्यांमध्ये एग्नेश चॉ जहां २२ तर, नाथन लॉ २६ वर्षांचा आहे. या तरुण आंदोलनकांनी मोठ्या हिमतीने आंदोलन लावून धरले आहे. वेळप्रसंगी रक्त सांडण्याची या आंदोलकांची तयारी आहे. त्यामुळेच चीनला आंदोलनाची धास्ती वाटू लागली आहे.

कोण आहे जोशुआ वॉन्ग?

डोमेसिस्टो पार्टीचे सरचिटणीस म्हणून जोशुआ वॉन्ग काम पाहतो. हाँगकाँगमध्ये लोकशाहीची त्यांची मागणी आहे. जोशुआने सुरुवातीला एका विद्यार्थी संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. २०१४मध्येच तो जगाच्या नजरेत आला होता. त्यावेळी त्याने आंदोलनांना सुरुवात केली होती. त्याचवेळी टाईम मॅगझीनने त्याला सर्वांत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केलं होतं. फॉर्च्युने २०१५मध्ये जोशुआ वॉन्गला जगातील महान नेत्यांच्या यादीत स्थान दिलं होतं. गेल्या वर्षी २२ वर्षांचा असतानाच जोशुआ वॉन्गला नोबेल शांतता पुरस्कारांसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...