Hong Kong: चीननं स्वातंत्र्यावर गदा आणली, अमेरिकेनं हाँगकाँगचा विशेष दर्जा केला रद्द

लोकल ते ग्लोबल
Updated May 28, 2020 | 20:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hong Kong Special Trading Status: अमेरिकेनं चीनचा प्रभाव असलेल्या हाँगकाँगचा विशेष दर्जा रद्द करत म्हटलं की, आता याला चीनच्या प्रभावाखाली म्हणता येणार नाही आणि इथं आंदोलकांची क्रूर दडपशाही केली जातेय.

Hong Kong US China
अमेरिकेनं हाँगकाँगचा विशेष दर्जा केला रद्द, जाणून घ्या कारण  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेनं रद्द केला हाँगकाँगचा विशेष दर्जा
  • अमेरिकेतील संसदेत सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पियोंन यांनी दिली माहिती, चीनला धक्का
  • अब्जावधींच्या व्यवसायावर होणार परिणाम, जाणून घ्या यामागचं कारण

वॉशिंग्टन डीसी: संयुक्त राष्ट्र अमेरिकेनं बुधवारी अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत हाँगकाँगचा विशेष दर्जा रद्द केलाय, ज्या अंतर्गत चीनच्या प्रभावाखाली असलेल्या या आर्थिक हबसाठी व्यापाऱ्यांचा विशेषाधिकार काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेनं चीनवर हाँगकाँगचं स्वावलंबन दडपण्याचा आरोप करत म्हटलंय की, आता हाँगकाँगला चीनपासून स्वायत्त म्हटलं जाणार नाही. एएफपीनं ही बातमी दिलीय.

यापूर्वी बातमी आली होती की, अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पिओनं बुधवारी काँग्रेसला सांगितलं की, हाँगकाँग आता अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत आपल्या विशेष दर्जासाठी योग्य नाहीये. चीनच्या रबर-स्टँम्प संसदेत हाँगकाँगच्या एका नवीन सुरक्षा कायद्यावर एक महत्त्वपूर्ण चर्चा आणि निर्णय घेण्यासंदर्भात इथं विरोध प्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जातंय. चीननं आधीही अनेकदा हिंसेचा मार्ग अवलंबून हाँगकाँगचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आलाय.

अमेरिकेच्या या निर्णयाचा अर्थ असा आहे की, अमेरिकेकडून हाँगकाँगला मिळणारे विशेष अधिकार आता मिळणार नाहीत. चीनसोबत अमेरिकेला सुद्धा यामुळे व्यावसायिक दृष्टीनं नुकसान होईल. मात्र याचा सर्वाधिक परिणाम हाँगकाँगवर होईल.

Hong Kong US China

(Photo- AP)

१९९७ पासून चीनच्या अधिकाराखाली आलं हाँगकाँग, मिळाला विशेष दर्जा

राज्याचे सचिव माईक पोम्पिओनं काँग्रेसला प्रमाणित केलंय की, अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत हाँगकाँगला विशेष दर्जा देण्याची गरज नाहीय आणि हे क्षेत्र १९९७मध्ये चीनच्या अधिकाराखाली आल्यानंतर पण याचा फायदा घेतला जात आहे. खरंतर इथं खरी बाब अब्जावधी डॉलरच्या व्यापाराची आहे. जिथं अमेरिकेच्या विशेष दर्जा देण्यामुळे हाँगकाँगला फायदा होत आहे आणि आता अमेरिकेला वाटतं की, प्रत्यक्षात याचा फायदा चीन उचलत आहे.

इंग्रजांना बीजिंगनं दिलं होतं स्वावलंबी करण्याचं वचन

अमेरिकेत गेल्या वर्षी पास झालेल्या एका कायद्याअंतर्गत हे सिद्ध करावं लागेल की, चीनकडून हाँगकाँगला स्वातंत्र्य दिलं जात आहे. याबाबतीत बीजिंगचं इंग्रजांचं हे क्षेत्र सोडून जातांना बातचित झाली होती. सेक्रेटरी ऑफ स्टेट पोम्पेओनं एका व्यक्तव्यात म्हटलं, ‘कुणीही योग्य व्यक्ती आज हा दावा करू शकत नाहीये की, हाँगकाँगसाठी चीनकडून स्वातंत्र्य दिलं गेलं आहे.’

Hong Kong US China Special Status

photo-AP

पूर्व आशियाचे प्रमुख विदेश विभागाचे अधिकारी डेविड स्टिलवेल यांनी म्हटलं की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अखेरचा निर्णय घेतील की, कोणती कारवाई केली जाईल. हा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच लागू केला जाऊ शकतो.

ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र अमेरिका हाँगकाँगच्या लोकांना नुकसान पोहोचवू इच्छित नाही. असा निर्णय बीजिंगच्या सरकारमुळे घ्यावा लागतोय, ना ही अमेरिकेमुळे.

चीन उचलत आहे हाँगकाँगचं स्वातंत्र्य संपविण्याचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसनं गुरूवारी हाँगकाँगमध्ये सुरक्षा कायद्यावर आणखी एक पाऊल उचलत दहशतवाद आणि परदेशी हस्तक्षेपावर प्रतिबंध लावणार आहे. हाँगकाँगच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, असं केल्यास या भागाचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल. याचाच विरोध करण्यासाठी हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शन केलं जातंय आणि चीनकडून बळजबरीनं हे प्रदर्शन रोखलं जातंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी