सेक्स रॅकेट चालवणारा आरोपी प्यारे मियाच्या घरावर चालवला बुलडोझर, आक्षेपार्ह वस्तू जप्त

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 21, 2020 | 14:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंदूरमध्ये प्रशासनाने प्यारे मियां याच्या घरावर कारवाई करत ते जमीनदोस्त केले आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचाही आरोप आहे. यावेळी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

House of sex racketeer Pyare Miyan bulldozed, objectionable objects seized
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोप असणाऱ्या प्यारे मियां याच्या घरावर चालला बुलडोझर, आक्षेपार्ह वस्तू जप्त  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात आहे प्यारे मियां
  • घटनास्थळी मिळाल्या दारूच्या बाटल्या
  • अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचा संशय

इंदूर: अल्पवयीन मुलींचे (Minor girls) लैंगिक शोषण (sexual harassment) केल्याचा आरोप (allegations) असलेला प्यारे मियां (Pyaare Miyan) याच्याविरोधात प्रशासन कडक पावले (strict action) उचलत आहेत. याप्रकरणी मोठी कारवाई (big action) करत प्रशासनाने शुक्रवारी लालाराम नगरमधील (Lalaram Nagar) त्याचा अशियाना नावाचा बंगला (Ashiyana bungalow) जमीनदोस्त  (demolished) केला. यादरम्यान इथे दारूच्या बाटल्यांसह (liquor bottles) अनेक आक्षेपार्ह वस्तू (objectionable objects) जप्त (seized) करण्यात आल्या. इंदूर नगर निगम (Indore Nagar Nigam) आणि पोलिसांच्या (police) संयुक्त कारवाईत (collective action) प्यारे मियां याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात (house bulldozed) आला.

लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात आहे प्यारे मियां

प्यारे मियां याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला जुलै महिन्यात अटक झाली असून तो जेलमध्ये आहे. आता शुक्रवारी प्रशासनाने त्याच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवत इंदूरच्या उच्चभ्रू वस्तीतील त्याचे दुमजली घर उध्वस्त केले. इथे दारूच्या बाटल्यांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या.

घटनास्थळी मिळाल्या दारूच्या बाटल्या

असे सांगितले जात आहे की, प्यारे मियां याने इंदूरमधील आपल्या दुमजली घराच्या गच्चीवर एक लग्झरी पेंटहाऊसही तयार केले होते. इथे बार कॅबिनेटही होते जिथे कारवाईदरम्यान पोलिसांना किंमती परदेशी दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत. तर इथल्या बैठकीच्या खालून तलवारही मिळाल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने याआधीही भोपाळमधल्या प्यारे मियां याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. असा आरोप आहे की, प्यारे मियां आधी मुलींना पार्टीत बोलावून नंतर त्यांना दारू पाजून त्यांचा बलात्कार करत असे. इतकेच नाही, तर ज्या अल्पवयीन मुलींचे तो शोषण करत असे त्यांच्याकडून तो स्वतःला अब्बू म्हणवून घेत असे. त्याच्या अड्ड्यांवर दारू, डान्स बार आणि पोर्नोग्राफीचे साहित्य असल्याचाही खुलासा झाला आहे.

अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचा संशय

६८ वर्षीय प्यारे मियां याच्यावर अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचा आरोप आहे. त्याचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचाही पोलिसांना संशय आहे. यादिशेने तपास चालू झाला आहे. प्यारे मियांचे मोठ्या ड्रग्स माफियांशीही संबंध असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस याप्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास तेव्हा सुरू झाला जेव्हा पोलिसांना जुलै महिन्यात गस्त घालताना रात्री साधारण ३ वाजता काही अल्पवयीन मुली दारूच्या नशेत रस्त्यावर फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांना चाईल्ड हेल्पलाईनच्या ताब्यात दिले जिथे त्यांच्या चौकशीदरम्यान या गोष्टी समोर आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी