Ayman-Al-Zawahiri : लादेनला भेटल्यानंतर डोळ्यांचा डॉक्टर कसा बनला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी...अयमान अल-जवाहिरीची जबरदस्त कहाणी

Story of Ayman-Al-Zawahiri : अल कायदाचा प्रमुख आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अयमान अल-जवाहिरी (Ayman-Al-Zawahiri)अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी याला दुजोरा दिला असून त्यांनी म्हटले आहे की न्याय झाला. ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) अमेरिकी लष्कराने पाकिस्तानातील जलालाबादमध्ये ठार केल्यानंतर जवाहिरी अल कायदाचा म्होरक्या बनला होता. बिन लादेन मारला गेल्यानंतर अल-जवाहिरीची जागतिक दहशतवादी म्हणून ओळख झाली.

Most wanted Ayman-Al-Zawahiri
मोस्ट वॉंटेड दहशतवादी अयमान अल जवाहिरी 
थोडं पण कामाचं
  • अल कायदाचा प्रमुख आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अयमान अल-जवाहिरी (Ayman-Al-Zawahiri)अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार
  • ओसामा बिन लादेनला ठार झाल्यानंतर जवाहिरी अल कायदाचा म्होरक्या बनला होता
  • विद्वान आणि डॉक्टरांच्या इजिप्शियन मध्यमवर्गीय कुटुंबात बनलेला जवाहिरी बनला मोस्ट वॉंटेड दहशतवादी

Ayman-Al-Zawahiri Story : नवी दिल्ली : अल कायदाचा प्रमुख आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अयमान अल-जवाहिरी (Ayman-Al-Zawahiri)अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी याला दुजोरा दिला असून त्यांनी म्हटले आहे की न्याय झाला. ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) अमेरिकी लष्कराने पाकिस्तानातील जलालाबादमध्ये ठार केल्यानंतर जवाहिरी अल कायदाचा म्होरक्या बनला होता. बिन लादेन मारला गेल्यानंतर अल-जवाहिरीची जागतिक दहशतवादी म्हणून ओळख झाली. त्याच्यावर 2.5 कोटी डॉलर्सचे इनाम होते. मात्र एक डॉक्टर जगातील कुख्यात दहशतवादी कसा बनला याची कहाणीदेखील तितकीच रंजक आहे. जवाहिरीचा डॉक्टर ते दहशतवादी होण्यापर्यतची कहाणी जाणून घेऊया. (How Ayman-Al-Zawahiri who was eye surgeon become the most wanted after meeting Osama Bin Laden)

अधिक वाचा : Health Tips : औषधे घेताना चुकुनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला पोचेल हानी

विद्वान आणि डॉक्टरांच्या कुटुंबात जन्म

जवाहिरीचा जन्म विद्वान आणि डॉक्टरांच्या इजिप्शियन मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यालाही लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. त्याचचे आजोबा राबिया अल-जवाहिरी होते, हे अल अझहरचे ग्रँड इमाम होते. हे मध्य पूर्वेतील सुन्नी इस्लामिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. तसेच ही इस्लाम धर्मातील महत्त्वाच्या मशिदींपैकी एक आहे.

अधिक वाचा : Virus News: मुंबई, ठाण्यातल्या लहान मुलांमध्ये आढळली 'या' Dangerous आजाराची लक्षणं

इजिप्तच्या सैन्यात सर्जन म्हणून काम केले

अल-जवाहिरीने तीन वर्षे इजिप्शियन सैन्यात सर्जन म्हणून काम केले. जवाहिरीचा नेत्रचिकित्सक ते मोस्ट वॉन्टेड जागतिक दहशतवादी असा प्रवास 1986 मध्ये लादेनला भेटल्यावर सुरू झाला. तो लादेनचा वैयक्तिक सहाय्यक आणि डॉक्टर म्हणून काम करत होता.

1993 मध्ये इजिप्तमध्ये इस्लामिक जिहादचे नेतृत्व 

1993 मध्ये त्याने इजिप्तमधील इस्लामिक जिहादचे नेतृत्व स्वीकारले. सरकार उलथून टाकून इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या 1990 च्या दशकाच्या मध्यातील आंदोलनाचा जवाहिरी हा एक प्रमुख चेहरा बनला. इजिप्तमधील 1,200 हून अधिक लोकांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 1998 मध्ये जवाहिरीने इजिप्तच्या इस्लामिक जिहादचे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. केनियातील नैरोबी, आफ्रिकेतील दार एस सलाम आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासात जवळपास एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले, ज्यात 224 लोक मारले गेले. यामध्ये 12 अमेरिकन आणि 4,500 हून अधिक लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटातील भूमिकेसाठी जवाहिरीवर ठपका ठेवण्यात आला होता.

अधिक वाचा : Weight loss Tips in Marathi  : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

9/11 च्या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक

11 सप्टेंबर 2001 रोजी अल-जवाहिरीने सर्वात भयानक दहशतवादी कट पार पाडला. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 3,000 लोक मारले गेले. तो आणि बिन लादेन 2001 मध्ये अमेरिकन सैन्यापासून सुटका करून घेण्यासाठी अफगाणिस्तानात निसटले. 2001 मध्ये, अमेरिकन सरकारने जवाहिरीला जगातील क्रमांक दोनचा सर्वात वाँटेड दहशतवादी घोषित केले होते. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याच्या एका वर्षानंतर जवाहिरी मारला गेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला न्यायाची मोहीम म्हटले आहे. "या गोष्टीसाठी कितीही वेळ लागला तरी, तुम्ही कुठेही लपलात, मात्र तुमच्यापासून आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून काढेल," असे जो बायडेन यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी