Neemuch Viral Video: नवी दिल्ली : देशातील नागरिकांमध्ये एकमेंकांच्या धर्माविषयी मोठी तेढ आणि द्वेष निर्माण होऊ लागला आहे. फक्त नावावरुन लोकांना टार्गेट केलं जातं असल्याचं दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमचमध्येही मॉब लिंचिग (Mob lynching) याचप्रकारे करण्यात आली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या मारहाणीचा व्हिडिओ (Video) सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मारहाण करण्यात आलेला व्यक्ती हा कोणी मुसलमान नसून त्याचं नाव भवरलाल जैन आहे. दरम्यान या प्रकरणात भाजप नेता दिनेश कुशवाह आणि त्याच्या साथीदारांवर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेता भवरलाल जैन यांना मोहम्मद समजून मारहाण करत होता, ज्यानंतर जैनचा मृत्यू झाला आहे. भाजप नेत्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसने नीमचमध्ये मॉब लिंचिंग झाल्याचे म्हटले आहे.
नीमचमधील मनसा पोलीस स्टेशनचे टीआय (एसएचओ) म्हणाले की, काल आम्हाला रामपुरा रोडवर एक मृतदेह सापडला होता. आम्ही मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतला, त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आज म्हणजेच शनिवारी मृताच्या भावाच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आढळून आला, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या मृत भावाला मारहाण करत होता. तो व्हिडिओ तपासण्यात आला. नंतर त्याच्या भावाने एफआयआर लिहून घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मनसाचा आहे. चौकशीत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव भवरलाल जैन असून तो सरसी तहसील, जावरा येथील रहिवासी होते. मनसा रामपुरा रोडवर शनिवारी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आले. व्हिडिओमध्ये भवरलाल जैन यांना 'तू मुस्लिम आहेस का' असे विचारले जात असून या नावाने त्यांना मारहाण केली जात आहे. मृताचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. कुटुंबीय सकाळी मानसा येथे आले आणि भवरलाल जैन यांना त्यांच्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले.
व्हिडिओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती दिनेश कुशवाह असून तो मानसाची रहिवासी आहे. तो माजी नगरसेवक बिना कुशवाह यांचे ते पती आहे. व्हिडिओमध्ये ते भंवरलाल जैन यांना तुम्ही मुस्लिम आहात का? असं विचारत आहेत दरम्यान, नीमच जिल्ह्यात हिंदू मुस्लिमांच्या नावाने होणारी मॉब लिंचिंगची ही पहिलीच घटना आहे. भंवरलाल जैन हे मतीमंद असून १५ मे पासून त्यांच्या घरातून चित्तौडगडला रवाना झाले होते, त्यामुळे ते मंद झाले होते. गेल्या पाच दिवसांपासून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मनसा भाजप मंडल अध्यक्ष मुकेश डांगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या भाजप संघटनेत कोणतेही पद भूषवत नाही.