Voter survey: केंद्र आणि राज्य सरकारवर मतदार किती नाराज, सर्व्हेमध्ये झाला खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 19, 2021 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयएएनएस-सीव्होर गर्व्हनन्स इंडेक्स सर्वेने अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पुढील वर्षी अनेक राज्यांमधील निवडणुकांआधी मोठ्या प्रमाणात मतदारांचा कल दिसू शकतो. 

voter
केंद्र, राज्य सरकारवर मतदार किती नाराज, सर्व्हेमध्ये खुलासा 
थोडं पण कामाचं
  • ट्रॅकरनुसार केंद्र सरकारविरोधात सगळ्यात कमी नाराजी तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आहे
  • राज्य सरकारवरील नाराजीबाबत बोलायचे झाल्यास केरळ, पश्चिम बगाल आणि तामिळनाडू राज्यात राज्य सरकारविरोधात कमी राग आहे.
  • छत्तीसगड प्रकरणात सर्वाधिक राग केंद्र सरकार आणि राज्याच्या आमदारांविरोधात आहे.

मुंबई: तुमचा केंद्र सरकारवर किती राग आहे? तुम्ही तुमच्या आमदारावर किती नाराज आहात? तुम्हाला खासदाराचा किती राग येतोय? तुम्ही राज्य सरकारवर किती नाखुश आहात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आयएएनएस-सीव्होर गर्व्हनन्स इंडेक्स सर्व्हेच्या आकड्यावरून समजतील. या सर्व्हेवरून हे आढळते की तुम्ही केंद्र तसेच राज्य सरकारवर किती नाराज आहात. 

सीव्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख म्हणाले की केंद्र आणि राज्यांच्या कामकाजावर लक्ष दिले जात आहे. गेल्या दीड वर्षातील कोरोना काळादरम्यान रागाचा प्रश्न आहे तो स्थानिक प्रशासन म्हणजेच लोकल गर्व्हनन्सची यात कोणतीच गणती नाही. आयएएनएस-सीव्होर गर्व्हनन्स इंडेक्स च्या सर्व्हेनुसार केंद्र आणि राज्य सरकारविरोधात स्थानिक स्तरापेक्षा अधिक राग आहे.

ट्रॅकरनुसार केंद्र सरकारविरोधात सगळ्यात कमी नाराजी तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आहे. तर केंद्र सरकारविरोधात सर्वाधिक राग जम्मू-काश्मीर, केरळ आणि पंजाब राज्यात आहे. राज्य सरकारवरील नाराजीबाबत बोलायचे झाल्यास केरळ, पश्चिम बगाल आणि तामिळनाडू राज्यात राज्य सरकारविरोधात कमी राग आहे. या सर्व राज्यांच्या नागरिकांनी नुकतेच नवे सरकार निवडले. राज्य सरकारविरोधात सर्वाधिक राग आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये आहे. 

छत्तीसगड प्रकरणात सर्वाधिक राग केंद्र सरकार आणि राज्याच्या आमदारांविरोधात आहे. छत्तीसगड प्रकरणात सर्वाधिक राग केंद्र सरकार आणि राज्याच्या आमदारांवर आहे. मात्र बघेल मध्ये हा राग कमी पाहायला मिळाल. छत्तीसगडमध्ये ४४.७टक्के मतदार केंद्र सरकारर नाराज आहेत तर ३६.६ क्के राज्य सरकारवर नाराज आहेत.

सीव्होटर ट्रॅकर भारताचे एकमेव दैनिक ओपिनियर ट्रॅकिंग एक्सरसाईज आहे जे एका कॅलेंडर वर्षात रँडमली निवडण्यात आलेल्या १ लाखाहून अधिक मतदारांचे मॅपिंग करते. हे ट्रॅकर ११ भारतीय भाषांमध्ये चालवले जाते. गेल्या दहा वर्षात त्यांनी व्यक्तिगतरित्या आणि सीएटीआयमध्ये १० लाखापेक्षा अधिक मतदारांचे इंटरव्ह्यू घेतले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी