IAS Pooja Singhal Story : रांची : पैशांचा डोंगर, पैशांचा ढिग हे शब्दप्रयोग आपण नेहमी वापरत असतो. मात्र प्रत्यक्षात असा पैशांचा ढिग तुम्ही नुकताच टीव्हीवर किंवा व्हिडिओत पाहिला असेल. बेडवर 500 आणि 2000 च्या नोटांचा व्हिडीओ तुम्हीही पाहिला असेल. ते चित्र असे होते की ज्याने पाहिले तो डोळे फाडून पाहतच राहिला. नोटा मोजण्यासाठी तासोनतास लागले, मशीन्सही गरम झाल्या. यानंतर झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा सिंघल (IAS Pooja Singhal)यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. गेल्या 3-4 दिवसांपासून पूजाचे नाव सोशल मीडियावर (Social Media)खूप चर्चेत आहे. वास्तविक, आयएएस पूजा सिंघल, तिचे पती अभिषेक झा (Abhishek jha) आणि इतर जवळचे नातेवाईक, अभिषेक आणि पूजा यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यांनंतर गुगल सर्चमध्ये (Google Search)पूजाला सर्वाधिक सर्च केले जात आहे. दोघांची कहाणी सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. पूजा सिंघलचे हे दुसरे लग्न आहे का, दोघे कसे भेटले, कोणाचे पहिले लग्न झाले आणि नंतर ते कसे वेगळे झाले. चला जाणून घेऊया. (How Pooja Singhal & Abhishek Jha met and divorced & ED raid)
अधिक वाचा : Karachi Blast: पाकिस्तानमुळे चीन मोठ्या अडचणीत! आता या गोष्टीची भीती, काय होणार मोठ नुकसान?
ऑस्ट्रेलियातून एमबीएची पदवी घेऊन परतलेल्या अभिषेक झा आणि पूजा सिंघल यांच्यातील मैत्री आणि त्यानंतर लग्नाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. पूजा सिंघलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेकची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. दोघांची फेसबुकवर भेट झाली. नंतर एका जिममध्ये जात असताना दोघांची मैत्री वाढली.
अधिक वाचा : Pakistan MP: ४९ वर्षीय पाक खासदाराचे तिसरेही लग्न मोडले; ३१ वर्षांनी लहान असलेल्या बायकोने केले गंभीर आरोप
त्यावेळी पूजाचे लग्न झाले होते. 21 वर्षे 7 दिवसाचे वय असताना IAS बनण्याच्या विक्रम पूजा सिंघलने केला होता. तिने सिनियर IAS राहुल पुरवार यांच्याशी लग्न केले, पण दोघांमधील हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोन-तीन वर्षांनी त्यांच्या परस्पर संबंधात तणाव वाढला. कारणे वेगळी होती. कालांतराने पूजा सिंघल आणि राहुल पुरवार यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटापूर्वीच पूजा आणि अभिषेकची मैत्री फुलली होती, असं म्हटलं जातं. त्यानंतर दोन्ही घरच्यांच्या संमतीने हा विवाह झाला. त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले चालले होते, परंतु ईडीच्या छाप्याने दोघांसाठी नवा पेच निर्माण झाला असून याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम होईल, हे येणारा काळच सांगेल.
अधिक वाचा : Elon Musk: इलॉन मस्कने त्याच्या मृत्यूबद्दल केले ट्विट; रशिया आणि पुतिन यांच्यावर साधला निशाणा
चतरा येथे उपायुक्त असताना पूजा सिंघल यांनी मनरेगा योजनेतून 2 स्वयंसेवी संस्थांना 6 कोटी रुपये दिले. असा प्रश्न विधानसभेतही उपस्थित झाला, पण नंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. खुंटी जिल्ह्यातील उपायुक्त असताना त्यांचे नाव मनरेगामधील 16 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आले होते, ज्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी, पलामूच्या उपायुक्तपदाच्या कार्यकाळात पूजा सिंघल यांच्यावर उषा मार्टिन समूहाला कथौटिया कोळसा खाण वाटप करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पूजा सिंघल या झारखंडच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे उद्योग सचिव आणि खाण सचिवपदाचा कार्यभार आहे. याशिवाय पूजा सिंघल या झारखंड राज्य खनिज विकास महामंडळाच्या (JSMDC) अध्यक्षा आहेत. याआधीही पूजा सिंघल या भाजप सरकारमध्ये कृषी सचिव पदावर होत्या. मनरेगा घोटाळ्याच्या वेळी पूजा खुंटी येथे डीसी म्हणून तैनात होती.