Apply For Passport : घरबसल्या पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अप्लाय, जाणून घ्या सोपी पद्धत

how to apply for passport online read in marathi : पासपोर्ट अर्थात पारपत्र. पासपोर्ट हा परदेश प्रवासाकरिता अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या देशाच्या सरकारकडे पासपोर्टसाठी अर्ज करता येतो.

Apply For Passport
घरबसल्या पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अप्लाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • घरबसल्या पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अप्लाय
 • जाणून घ्या सोपी पद्धत
 • भारताचा पासपोर्ट मिळवण्याची पद्धत

how to apply for passport online read in marathi : पासपोर्ट अर्थात पारपत्र. पासपोर्ट हा परदेश प्रवासाकरिता अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या देशाच्या सरकारकडे पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. संबंधित देशाचे परराष्ट्र मंत्रालय नियमानुसार पासपोर्ट देते. पासपोर्टद्वारे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान संबंधित प्रवाशाची ओळख आणि त्याचे राष्ट्रीयत्व याची अचूक माहिती प्रमाणित करणे (व्हेरिफाय) सोपे होते. पासपोर्टमध्ये पासपोर्ट धारकाचे पूर्ण नाव, त्याचे राष्ट्रीयत्व, त्याचा कायम निवासाचा पत्ता, जन्म स्थान, जन्म तारीख, फोटो, सही तसेच संबंधित व्यक्तीची वैयक्तिक ओळख स्पष्ट करणारी इतर माहिती असते. अनेक देशांच्या पासपोर्टमध्ये आता एक मायक्रोचिप बसवली जाते. यंत्राच्या मदतीने ही चिप रीड करून प्रवाशाची माहिती जाणून घेणे सोपे झाले आहे. चिपमुळे बनावट पासपोर्ट तयार करणे कठीण झाले आहे. 

पासपोर्ट तयार झाला की ज्या देशात जायचे आहे त्या देशाकडे व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. व्हिसा मिळाल्यानंतर पासपोर्ट आणि व्हिसा यांच्या आधारे प्रवासाकरिता तिकिटे काढता येतात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कौटुंबिक कारणासाठी, फिरण्यासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, सरकारी कामासाठी, राजकीय कामासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्व कारणांकरिता परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. 

पासपोर्ट हा संबंधित देशाचे नागरिक असल्याचा मोठा पुरावा समजला जातो. पासपोर्टमुळे परदेशाचा प्रवास करणे सोपे होते. आता अनेक देश ऑनलाईन पासपोर्ट काढण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊ लागले आहेत. भारतात पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. भारत सरकारने पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान केली आहे. यामुळे भारतात ऑनलाईन अर्ज करून पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

ही भाजी खा आणि स्मरणशक्ती वाढवा

भारताचे नागरिक घरबसल्या पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय (ऑनलाईन अर्ज) करू शकतात. जाणून घ्या पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय (ऑनलाईन अर्ज) करण्याची प्रक्रिया....

टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

बेलपत्र खाण्याचे फायदे

 1. पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय करण्याकरिता passportindia.gov.in वर जा
 2. होम स्क्रीनवरील रजिस्टर नाउ वर क्लिक करा आणि नोंदणी करा (रजिस्ट्रेशन करा)
 3. रजिस्ट्रेशन नंतर रजिस्टर्ड लॉगिन आयडी वापरा आणि पासपोर्ट सेवा ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन करा
 4. आता फ्रेश पासपोर्ट अथवा पासपोर्ट रिन्यूअल (पारपत्र किंवा पासपोर्ट नूतनीकरण) यावर क्लिक करून अप्लाय या बटणावर क्लिक करा.
 5. फॉर्म व्यवस्थित भरा. नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
 6. व्ह्यू सेव्ह किंवा सबमिटेड या ऑप्शनवर क्लिक करून बघा.
 7. पासपोर्टसाठी नियमानुसार आवश्यक शुल्क अर्थात पासपोर्ट फी दिसेल. आता पे अँड शेड्युल्ड अपॉइंटमेंट वर क्लिक करा. आपण आपली पासपोर्ट काढण्यासाठीची अपॉइंटमेंट अर्थात वेळ निश्चित करून घ्या. तत्काळ पासपोर्टसाठी दोन हजार रुपये पासपोर्ट फी आकारली जाते तर सामान्य प्रक्रियेने काढल्या जाणाऱ्या पासपोर्टसाठी 1500 रुपये पासपोर्ट फी आकारली जाते.
 8. नेट बँकिंग अथवा यूपीआय पेमेंट द्वारे पासपोर्ट फी भरता येते. पैसे देताच पावती उपलब्ध होते. या पावतीची प्रिंट काढून घ्या. पासपोर्ट मिळेपर्यंत ही पावती जपणे आवश्यक आहे. 
 9. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पासपोर्ट काढण्यासाठीची अपॉइंटमेंट अर्थात वेळ निश्चित झाल्याचा मेसेज आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल. या मेसेजमध्ये पासपोर्ट काढण्यासाठी कोणत्या पासपोर्ट सेवा केंद्रावर कोणत्या दिवशी आणि किती वाजता भेटावे हे कळेल. हा मेसेज जपून ठेवा.
 10. मेसेजमध्ये नमूद केलेल्या वेळेवर आपली सर्व कागदपत्रे घेऊन पासपोर्ट सेवा केंद्रावर (पासपोर्ट क्षेत्रीय केंद्र/ पासपोर्ट सेवा केंद्र) हजर राहा. कोणकोणती कागदपत्रे घेऊन पासपोर्ट काढण्यासाठी जायचे आहे याची माहिती आपल्याला मेसेजद्वारे कळवली जाईल. 
 11. पासपोर्ट सेवा केंद्रावर मेसेज आणि पेमेंट केल्याची रिसिट (पावती) दाखवून नंतर इतर कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याला दाखवा.

आपण आवश्यक ती कागदपत्रे दाखवली तर नियमानुसार विहित मुदत संपण्याआधीच पासपोर्ट मिळेल. पासपोर्ट टपाल विभागाद्वारे आपल्या नमूद पत्त्यावर पाठवला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी