CBSE Class 10th Result 2022: आज CBSE 10 वीचा निकाल येण्याची शक्यता, 'या' लिंकवर क्लिक करून असा तपासा तुमचा रिझल्ट

CBSE Class 10th Result 2022: आज सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी (CBSE Board Exam)निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

how to check CBSE Class 10th Result 2022
आज CBSE 10 वीचा निकाल येण्याची शक्यता 
थोडं पण कामाचं
  • आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
  • कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो.
  • आज कधीही दहावी निकाल 2022 च्या रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली: CBSE 10th Results 2022: आज सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी  (CBSE Board Exam)निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE आज अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर इयत्ता 10वीचा निकाल 2022 जाहीर करेल. या वर्षी CBSE ने परिक्षा संगम नावाचे एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. ज्याद्वारे विद्यार्थी CBSE टर्म 2 चा निकाल सहज तपासू शकणार आहेत. .

यावर्षी टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in जाहीर केला जाईल.

अधिक वाचा- राज्यात 5-6 महिन्यात मध्यवर्ती निवडणुका होणार?, शरद पवार यांनी NCPच्या आमदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

तारीख आणि वेळ याची शक्यता आहे. ते बदलण्याची शक्यता आहे. सर्वांना CBSE इयत्ता 10वी निकाल 2022 चे लाइव्ह अपडेट येथे तपासण्याचा सल्ला दिला जातो. नव्याने लाँच करण्यात आलेले परिक्षा संगम डिजिटल पोर्टल CBSE इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षेचे निकाल सहज तपासण्यास मदत करेल.

CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022: परिक्षा संगम पोर्टलवर तपासा

  1. parikshasangam.cbse.gov.in या वेबसाइटवर जा.
  2. 'शाळा' लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन पेज उघडल्यावर 'Examination Activity' वर क्लिक करा.
  4. त्यानंतर Theory Marks Upload वर क्लिक करा.
  5. निकाल जाहीर झाल्यानंतर तुमचे गुण दिसून येतील.
  6. निकाल तपासा, डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

उमेदवार मोबाईल Application UMANG आणि DigiLocker वरून CBSE इयत्ता 10वी टर्म 2 चा निकाल 2022 तपासू शकतील आणि CBSE 10वी टर्म 2 चा निकाल SMS सेवेद्वारे देखील उपलब्ध असेल. या वर्षी 35 लाख विद्यार्थ्यांनी CBSE इयत्ता 10वीची परीक्षा 2022 ला दिली होती.

अधिक वाचा- आदित्य ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार?

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, सीबीएसई बोर्ड 4 जुलै रोजी निकाल जाहीर करू शकेल, जरी याबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या निकालांसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवले पाहिजे आणि टाइम्स नाऊ मराठीशी देखील कनेक्ट रहावे जेथे CBSE परीक्षांशी संबंधित नवीनत अपडेट्स देण्यात येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी