कोरोना लस घेतल्यानंतर या गोष्टींची घ्या काळजी, चुकूनही करू नका ही कामे

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2021 | 18:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Coronavirus Vaccine Side Effects:कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरतोय. हे पाहता लसीकरण वेगाने सुरू आहे. अधिकाधिक लोकांना ती उपलब्ध करून दिली जात आहे. 

vaccination
कोरोना लस घेतल्यानंतर या गोष्टींची घ्या काळजी 

थोडं पण कामाचं

  • लसीकरणानंतर वर्कआऊट न केल्यास चांगले
  • कोरोना लस घेण्याच्या आधी अथवा नंतर कोणतीही लस घेऊ नका
  • लस घेतल्यानंतर शरीर हायड्रेट राखणे गरजेचे असते

मुंबई: देशात वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता प्रत्येक राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. दरम्यान, काही लोकांना लसीकरणानंतर शरीरावर साईड इफेक्टस दिसत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने(WHO)ने कोरोना व्हायरसच्या लसीला सुरक्षित असल्याचे सांगत लसीकरणानंतर हलकेसे साईडइफेक्ट होणं सामान्यअ असल्याचे म्हटले आहे. या गोष्टीवरून हे समजते की तुमचे शरीर प्रोटेक्शनसाठी तयार होत आहे.

WHO ने गेल्या काही दिवसांमध्ये सांगितले होते की लसीकरणानंतर थोडासा ताप, अंगदुखी, ही सामान्य आहेत मात्र याला घाबरण्याची गरज नाही. हे याचे संकेत आहेत की तुमच्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम या लसीला प्रतिक्रिया देत आहे. काही दिवसांत हे साईडइफेक्ट निघून जातात. इंजेक्शन दिले त्या ठिकाणी दुखणे, थकवा, डोकेदुखी ही सर्व सामान्य साईड इफेक्ट्सची लक्षणे आहेत. 

जर तुम्हीही लस घेतली असेल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

सगळ्यात आधी आपल्या लसीचा डोस घेतल्यानंतर कामावर जाऊ नका. घरी राहून आराम करण्याचा प्रयत्न करा. याचे कारण म्हणजे या लसीचे साईड इफेक्ट्सह पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आराम केलेला बरा. 

कोरोनाचीलस घेतल्यानंतर त्याआधी अथवा त्यानंतर कोणतीही लस घेऊ नका. मेडिकल तज्ञांच्या मते इतर लसींची या कोरोनाच्या लसीसोबत रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे हे सुरुक्षित आहे की नाही याबाबत समजलेले नाही. 

जर कोणी कोरोनाची लस घेतली आहे आणि काही वेळानंतर त्या जागी टॅटू बनवल्यासतर त्यामुळे इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर होऊ शकतो. दरम्यान, असे करू नका. 

लस घेतल्यानंतर लगेचच वर्कआऊट करू नका. यामुळे तुमच्या मांसपेशी दुखतील. वर्कआऊट केल्यास हे दुखणे अधिक वाढू शकते. 

लस घेतल्यानंतर शरीराला हायड्रेट करणे गरजेचे आहे कारण इम्युन रिस्पॉन्सला प्रोसेस करण्यासाठी पाणी शरीराची मदत करते. तसेच लस घेतल्यानंतर ताप कमी करण्यास पाणी गरजेचे ठरते. 

लस घेतल्यानंतर काही दिवसांसाठी सिगरेट आणि दारूपासून स्वत:ला दूर ठेवा.

कोरोना लस घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल ते सांभाळून ठेवा. येणाऱ्या काळात प्रवास, व्हिसासाठी तुम्हाला याची गरज पडू शकते. तुम्ही हे डिजीटल स्टोरही करू शकता. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची छोटीसी चूक तुम्हाला कोरोना संक्रमित करू शकते. त्यामुळे सातत्याने कोरोनाच्या नियमांचे पालन करा. मास्क घाला. सोशल डिन्स्टन्सिंग ठेवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी