Howdi Modi: 'अब की बार ट्रम्प सरकार'- नरेंद्र मोदी

Howdi Modi Event Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील ह्यूस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये मोदींचा 'हाऊडी मोदी' कार्यक्रम पार पडला. पाहा या कार्यक्रमाचे अपडेट्स....

howdi modi event live coverage pm narendra modi america us presidnet donald trump houston texas
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • अमेरिकेत 'हाऊडी मोदी' कार्यक्रम
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना केलं संबोधित
 • हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी ५०,००० हून अधिक नागरिकांची उपस्थिती

Howdi Modi Mega Event: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमधील ह्यूस्टन येथे 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांना संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं. सोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भाषण केलं. या कार्यक्रमासाठी ५० हजारांहून अधिक भारतीय नागरिक उपस्थित होते. पाहा या कार्यक्रमाच्या संदर्भातील अपडेट्स...

 1. कॉर्पोरेट टॅक्समध्ये करण्यात आलेल्या कपातीच्या निर्णय हा अर्थव्यवस्थेला मजबूत करेल - मोदी
 2. गेल्या पाच वर्षांत जगभरात अनिश्चितता असातानाही भारताने चांगला विकास केला आहे - मोदी 
 3. इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणुक परिस्थिती तयार करत भारत पुढे जात आहे - मोदी 
 4. डोनाल्ड ट्रम्प आता संपूर्ण ताकदसह दहशतवादाविरोधात लढण्यास तयार आहेत - मोदी
 5. आता लढाई करण्याची वेळ आली आहे - मोदी 
 6. अमेरिकेत झालेला ९/११ हल्ला असो किंवा मुंबईत झालेला २६/११ चा हल्ला असो या हल्ल्यामागचे दहशतवादी कोठे आहेत? - मोदी
 7. नाव न घेता मोदींची इम्रान खान यांच्यावर टीका 
 8. भारत घेत असलेल्या निर्णयांमुळे काहींना त्रास होत आहे, ज्यांना स्वत:चा देशही सांभाळता येत नाही - मोदी
 9. जम्मू-काश्मीरमधील महिला, गरिबांसोबत होणारा भेदभाव थांबला आहे - मोदी 
 10. आता भारतीय संविधानाने जो अधिकार इतर नागरिकांना दिला आहे तोच अधिकार जम्मू-काश्मीर, लडाखवासियांना मिळालाय - मोदी
 11. कलम ३७० मुळे दहशतवादाला खतपाणी घातलं जात होतं - मोदी 
 12. कलम ३७० ने जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना विकास आणि समान अधिकारापासून वंचित ठेवलं होतं - मोदी
 13. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या गोष्टीला फेअरवेल दिलं - मोदी
 14. भारतीय नागरिक विकासापासून दूर राहतील हे भारताला मंजूर नाही - मोदी 
 15. आठ कोटींहून अधिक बनावट नावांना फेअरवेल दिलं आहे - मोदी 
 16. गेल्या दोन-तीन वर्षांत भारतात साडे तीन लाख संशयास्पद कंपन्या बंद केल्या - मोदी 
 17. पूर्वी टॅक्स रिटर्न महिन्यांत येत होता पण आता अवघ्या काही दिवसांत थेट बँकेत जमा होतो - मोदी 
 18. ३१ ऑगस्ट या एकाच दिवशी जवळपास ५० लाख नागरिकांनी आपला आयटीआर ऑनलाईन भरलं आहे - मोदी
 19. पूर्वी टॅक्स रिटर्न भरणं ही एक मोठी समस्या होती पण आता खूप बदल झाले आहेत - मोदी
 20. आता २४ तासांत नव्या कंपनीची नोंदणी होते - मोदी
 21. आता आठवड्याभरातच पासपोर्ट घरी येतो - मोदी
 22. इंटरनेट डेटा सर्वात कमी किमतीत भारतात मिळतो - मोदी  
 23. भारतातील शंभर टक्के कुटुंब बँकेसोबत जोडलेत - मोदी 
 24. गेल्या पाच वर्षांत ११ कोटी शौचालयांची निर्मिती केलीय - मोदी 
 25. गेल्या पाच वर्षांत १३० कोटी भारतीयांनी मिळून प्रत्येक क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे - मोदी
 26. भारत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रगती करु इच्छित आहे - मोदी
 27. भारताचा सर्वात मोठा नारा 'न्यू इंडिया' - मोदी 
 28. भारताचा सर्वात मोठा मंत्र 'सबका साथ सबका विकास' - मोदी 
 29. भारतातील सर्वात चर्चित शब्द आहे 'विकास' - मोदी
 30. तसेच मोठ्या संख्येने महिला उमेदवार विजयी झाल्या - मोदी
 31. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान महिला मतदारांनी केलं - मोदी 
 32. यंदाच्या निवडणुकीत ८ कोटी तरुणांनी प्रथमच मतदान केलं - मोदी
 33. भारतात सर्व छान सुरु आहे - मोदी
 34. हाऊडी मोदी या प्रश्नाचं उत्तर 'भारतात सर्वकाही छान सुरु आहे' - मोदी
 35. या कार्यक्रमाचं नाव हाऊडी मोदी आहे मात्र मोदी एकटा काहीही नाहीये, मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा व्यक्ती - मोदी 
 36. ह्यूस्टन आणि टेक्सास प्रशासनाचं कौतुक, ज्यांनी दोन दिवसांपूर्व बदललेल्या हवामानानंतर परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली - मोदी
 37. टेक्सासमधील वातावरण अकल्पनीय आहे - मोदी 
 38. हाऊडी मोदी कार्यक्रमाने नवी हिस्ट्री आणि केमिस्ट्रि केली - मोदी 
 39. आज आपण येथे एक नवा इतिहास बनताना पाहत आहोत आणि नवी केमिस्ट्रि सुद्धा - मोदी
 40. नरेंद्र मोदींच्या हिंदी भाषणाला सुरुवात 
 41. भारत आणि अमेरिका यांची सीमा सुरक्षा खूपच महत्वाची - ट्रम्प
 42. मुस्लिम कट्टरपंथीयांविरोधात एकत्र लढूया - ट्रम्प
 43. दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यास आम्ही सज्ज आहोत - ट्रम्प
 44. मुंबईत एनबीए बास्केटबॉल स्पर्धा होणार - ट्रम्प 
 45. आंतराळ क्षेत्रात भारतासोबत मोहिम राबवणार - ट्रम्प
 46. भारताला संरक्षण क्षेत्रात अमेरिका मदत करणार - ट्रम्प 
 47. मोदीजी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक - ट्रम्प
 48. आम्ही नव्या रोजगार निर्मिती केली - ट्रम्प
 49. भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेमध्ये रोजगार निर्मिती - ट्रम्प 
 50. आम्ही मोठी करकपात केली - ट्रम्प
 51. आम्ही कायद्याचा आदर करतो - ट्रम्प
 52. मोदींच्या नेत्रृत्वात भारताने खूप मोठी प्रगती केली - ट्रम्प
 53. अमेरिकन प्रशासन नेहमीच भारतीयांच्या हितासाठी काम करतं - ट्रम्प 
 54. अमेरिकेतील भारतीयांचे ट्रम्प यांनी मानले आभार
 55. भारतीयांचं अमेरिकेत असणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद - ट्रम्प
 56. मोदींनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन - ट्रम्प
 57. टेक्सासमधील भारतीयांचं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं कौतुक
 58. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाला सुरुवात
 59. भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये आहे - मोदी
 60. 'अब की बार ट्रम्प सरकार' - मोदी 
 61. मी डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करतो - मोदी
 62. अमेरिकन नागरिकांसाठी असलेली डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता आणि एक मजबूत संकल्प अमेरिकेले आणखीन मजबूत करेल - मोदी
 63. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु
 64. भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात
 65. हाऊडी मोदी कार्यक्रमस्थळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाखल 
 66. की ऑफ ह्यूस्टनची प्रतिकृती देऊन मोदींचा सन्मान करण्यात आला 
 67. स्टेजवर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन सिनेट सदस्यांसोबत हस्तांदोलन केलं 
 68. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर पोहोचताच 'मोदी-मोदी'चा जयघोष 
 69. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर पोहोचले
 70. 'हाऊडी मोदी' कार्यक्रम लाईव्ह You tube वर
   
 71. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी केलेल्या ट्विटला मोदींनी रिट्विट करत म्हटलं, निश्चितच हा एक खूपच चांगला दिवस असेल. तुमच्यासोबत लवकरच भेट होईल. 
 72. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट - मित्राला भेटायला चाललो आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभागी होणअयापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं, ह्यूस्टनमध्ये आपल्या मित्रासोबत असेल. टेक्सासमध्ये हा एक खूपच चांगला दिवस असेल. 
 73. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी तेथे भारतीय नागरिकांनी उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. काही भारतीय नागरिकांनी तर चक्क ढोल घेऊन सेलिब्रेशन सुरु केल्याचं पहायला मिळत आहे. 
 74. हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी भारतीय नागरिकांची स्टेडियममध्ये येण्यास सुरुवात 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आणि ह्यूस्टन येथे पोहोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी