Howdy Modi: जाणून घ्या कार्यक्रमाविषयीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

हाऊडी मोदी कार्यक्रमात जवळपास 50 हजार लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकतील. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. परदेशी भारतीय या कार्यक्रमासाठी खूप उत्सूक आहेत. 

View of the NRG stadium
Howdy Modi: जाणून घ्या कार्यक्रमाविषयीचे 10 महत्त्वाचे मुद्दे  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात हाऊडी मोदी कार्यक्रमाला संबोधित करतील.
 • . या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा सहभाग असेल.
 • ही अमेरिकेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी राजकीय रॅली असेल ज्याचं स्वरूप कॉर्निव्हल किंवा रॉक स्टार कार्यक्रमासारखं असेल.

न्यू यॉर्कः  पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात हाऊडी मोदी कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा सहभाग असेल. असं सांगितलं जातं आहे की, ही अमेरिकेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी राजकीय रॅली असेल ज्याचं स्वरूप कॉर्निव्हल किंवा रॉक स्टार कार्यक्रमासारखं असेल. हाऊडी मोदी कार्यक्रमात जवळपास 50 हजार लोकं पंतप्रधान मोदी यांचं भाषण ऐकतील. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहेत आणि परदेशी भारतीय या कार्यक्रमासाठी खूप उत्साहित आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडिअममध्ये केलं जाणार आहे. जाणून घेऊया हा कार्यक्रम आणि एनआरजी स्टेडिअमबद्दल

 1. हाऊडी मोदी कार्यक्रमात अमेरिकेतील शीर्ष आमदार, काँग्रेसचे सदस्य, सिनेटर्स, राज्याचे राज्यपाल आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असतील. 
 2. असं म्हटलं जात आहे की, या कार्यक्रमासाठी आयोजकांना आतापर्यंत 2.4 मिलियन डॉलरचं देणगी मिळाली आहे.
 3. एनआरजी स्टेडिअममध्ये कमीत कमी 50 हजार लोकं पंतप्रधान मोदी यांचं भाषण ऐकतील. कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. 
 4. या स्टेडिअममध्ये आतापर्यंत रॉक स्टार्सचे कार्यक्रम आणि फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हाऊडी मोदी एक वेगळ्या प्रकारची राजकीय रॅली असेल.
 5. एनआरजी स्टेडिअमची क्षमता 71, 995 लोकांची आहे. म्हणजेच येथे इतके लोकं एकाच वेळी कार्यक्रम बघू शकतात.
 6. पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनाच्या आधी येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. कार्यक्रमात जवळपास 400 कलाकार आपली कला सादर करतील.
 7. स्टेडिअमच्या वर फॅब्रिक छप्पर असेल. जे पावसापासून बचाव करण्यासाठी बंद केलं आहे. यामुळे कार्यक्रमावर कोणताच परिणाम दिसून येणार नाही.
 8. हा स्टेडिअम आपल्या विशालतेमुळे प्रसिद्ध आहे. हा स्टेडिअम 1,900,000 चौरस फूट असा पसरला आहे. जेणेकरुन मोठे कार्यक्रम येथे आयोजित करता येतील.
 9. कार्यक्रमादरम्यान 186 लग्झरी सूट्स असतील. ज्यात दिग्गज व्यक्ती बसतील. लग्झरी सूट्समुळे कार्यक्रमाचा सौंदर्य आणखीन सुंदर दिसेल. 
 10. स्टेडिअमच्या आत  14,549 चौ. फूटाची मोठी एलईडी स्क्रिन्स लावण्यात येणार आहे. ज्यात कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

ह्युस्टनमध्ये अमेरिकेतील तेल आणि गॅस कंपन्या आहेत. पंतप्रधान मोदी येथे ऊर्जा क्षेत्रातील काम करणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांसोबत बैठक करतील आणि त्यांना भारतात गुंतवणूकीसाठीचं आमंत्रण देतील. अलिकडच्या वर्षांत, तेल आणि गॅस क्षेत्रात भारताची अवलंबन अमेरिकेवर वाढलं आहे. भारताची इच्छा आहे की, अमेरिकचं तेल, गॅस आणि ऊर्जा कंपनी भारतात गुंतवणूक करावी. जेणेकरून या क्षेत्रात दोन्ही देशाचा व्यवहार नव्या उंचीवर पोहोचावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी