Human Rights Day 2021 अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात !

Human Rights Day 2021 दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करतात. संयुक्त राष्ट्रांनी (UN) १९४८ पासून दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केली जाईल.

Human Rights Day 2021
अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात ! 
थोडं पण कामाचं
  • अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात !
  • १९४८ पासून दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन
  • यंदा शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन

Human Rights Day 2021 दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करतात. संयुक्त राष्ट्रांनी (UN) १९४८ पासून दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केली जाईल. जगभरातील नागरिकांचे मानवाधिकारांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच मानवाधिकारांविषयी जनजागृती करण्यासाठी १० डिसेंबर रोजी अनेक उपक्रम राबविले जातात.

भारतात २८ सप्टेंबर १९९३ रोजी मानवाधिकार कायदा करण्यात आला. देशात १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. जगातील कोणत्याही व्यक्तीचे जात, धर्म, राष्ट्रीयता, लिंग या निकषांच्या आधारे मानवाधिकार हिरावून घेतले जाऊ नये यासाठी मानवाधिकार कायदा आहे.जन्मतः सार्‍यांना स्वातंत्र्य आणि समानता मिळवून देण्यासाठी मानवाधिकार मदत करतात. मानवाधिकार दिनाचे हे ७३ वे वर्ष आहे. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जाईल.

मानवाधिकार दिनी Human Rights Day फेसबुक Facebook, व्हॉट्सअॅप Whatsapp, ट्विटर Twitter, टेलिग्राम Telegram तसेच इतर सोशल मीडिया social media प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाणारे लोकप्रिय मराठी संदेश marathi messages

  1. मानवी हक्क आयोगाचा एकच विचार; सामान्य नागरिकांच्या हिताचाच विचार
  2. अन्याय झाल्यास घाबरू नका; मानवी हक्क आयोग तुमच्यासाठी आहे हे विसरू नका
  3. एकतेचे बळ दाखवूया, अधिकारांचे रक्षण करुया; सगळ्यांना देऊ ज्ञान, मानवाधिकाराने ताठ ठेवू मान
  4. जात-धर्म, श्रीमंत-गरीब, लहान-मोठे, महिला-पुरुष; कोणीही असो, मानवाधिकार सर्वांना मिळो
  5. मानवाधिकार आयोगाचा प्रयत्न एकच; सर्व नागरिक आनंदी राहावेत सतत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी