Joe Biden | चीनी कंपनीने बायडेन यांच्या मुलाला भेट म्हणून दिला महागडा हिरा...बायडेन आणि चीन यांची डील?

Hunter Biden Helped Chinese Company | टर बायडेन याने १ कोटी डॉलरचे वार्षिक करार आणि ८०,००० डॉलर किंमतीच्या महागड्या हिऱ्याच्या बदल्यात अमेरिकेत चीनचा प्रभाव वाढवण्यास मदत केली आहे. न्यूयॉर्कच्या लेखिका मिरांडा डेवाइन यांनी 'लॅपटॉप फ्रॉम हेल' या आपल्या नव्या पुस्तकात हंटर बायडेन याच्या सीईएफसी या चीनी ऊर्जा कंपन्यांच्या गटाशी झालेल्या व्यवहारासंदर्भात माहिती दिली आहे.

Biden Family
बायडेन कुटुंबिय 
थोडं पण कामाचं
  • चीनी उर्जा कंपन्यांच्या गटाचे जो बायडेनचे चिरंजीव हंटर बायडेनशी संधान
  • चीनी कंपन्यांकडून हंटर बायडेनला कोट्यवधी डॉलरची कंत्राटे आणि महागडा हिरा
  • जो बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असताना व्यवहार झाला असल्याचा एका नव्या पुस्तकात आरोप

Hunter Biden Helped Chinese Company | वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या मुलाला हंटर बायडेनसंदर्भात (Hunter Biden)एक मोठी बातमी समोर आली आहे. हंटर बायडेन याने १ कोटी डॉलरचे वार्षिक करार आणि  ८०,००० डॉलर किंमतीच्या महागड्या हिऱ्याच्या बदल्यात अमेरिकेत चीनचा प्रभाव (China)वाढवण्यास मदत केली आहे. न्यूयॉर्कच्या लेखिका मिरांडा डेवाइन यांनी 'लॅपटॉप फ्रॉम हेल' (Laptop From Hell)या आपल्या नव्या पुस्तकात हंटर बायडेन याच्या सीईएफसी (China CEFC US)या चीनी ऊर्जा कंपन्यांच्या गटाशी झालेल्या व्यवहारासंदर्भात माहिती दिली आहे. हंटर बायडेन आपली दैनंदिनी आपल्या लॅपटॉपमध्ये लिहित होते. एप्रिल २०१९मध्ये हा लॅपटॉप दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर या लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर खुलासे होत आहेत. (Hunter Biden gets costly Diamond & millions of dollars contract from Chinese company)

बायडेन कुटुंब आणि चीनी कंपनी

हजारो व्हॉट्सअप मेसेज आणि ईमेल यांच्या आधारावर मिरांडा यांनी दावा केला आहे की बायडेन कुटुंबाने चीनच्या सीईएफसीचा व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी मदत केली आहे. याबदल्यात हंटर बायडेन यांना तीन वर्षे प्रत्येक वर्षी १ कोटी डॉलर आणि एक ८०,००० डॉलरचा महागडा हिरा भेट म्हणून मिळाला. आपल्या पुस्तकात मिरांडा म्हणतात सीईएफसी या चीनी कंपनींचे चेअरमन यी जियानमिंग यांच्यावर जगभरात चीनी ऊर्जा गटाचा प्रभाव वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने जियानमिंग यांना बायडेन कुटुंबाशी जवळीक वाढवण्याचा सल्ला दिला होता. 

हंटर बायडेनची जियानमिंगशी भेटीची तयारी

मिरांडा यांच्या पुस्तकात म्हटले आहे की जियानमिंगची हंटर बायडेन यांच्याशी भेट क्लिंटन प्रशासनातील एक माजी अधिकारी रॉब वॉकर यांच्या माध्यमातून झाली. मिरांडा यांच्या म्हणण्यानुसार डिसेंबर २०१५ मध्ये जियानमिंग आणि सीईएफसीचे व्यवस्थापकीय संचालक जियानजुग जांग यांनी वॉशिंग्टन डीसीसाठी एकत्र प्रवास केला होता. या बैठकीचा उल्लेख बंटर बायडेन यांनी आपल्या रोजनिशीमध्ये केला आहे.

बायडेन यांची जियानमिंग यांच्याशी भेट

हंटर बायडेन यांच्याबरोबर काम केलेल्या एका व्यक्तीने म्हटले आहे की हंटर बायडेन जियानमिंग यांच्याशी आपल्या वडिलांची भेट घडवून आणण्यासाठी सुट्ट्यांमधील एका पार्टीत घेऊन गेले होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये हंटरला यासंदर्भातील ईमेल पाठवण्यात आला होता. सीईएफसीने या काळात बायडेन यांना एक बिझनेस डील दिली होती. सीईएफसी हा गट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाचा विस्तार करणारा भांडवलशाही गट आहे. अर्थात सीईएफसीला आपल्या मनसुब्यांमध्ये यश आले नाही. कारण १८ नोव्हेंबर २०१७ ला एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी पॅट्रिक हो ची पिंगला अटक केली होती. हा जियानमिंगचा खास माणूस होता. याच व्यक्तीने युगांडाच्या परराष्ट्रमंत्र्यालादेखील लाच दिली असल्याचा आरोप होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी