Cyclone Asani : 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग; उत्तर-ईशान्य दिशेनेकडे वळवला मोर्चा, IMD कडून 'या' भागांसाठी 'रेड अलर्ट'

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा (Hurricane) मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) 'असनी' (Asani Cyclone) चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे..

Hurricane Asni changed route
Cyclone Asani : 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • चक्रीवादळ 'असनी' ने आपला मार्ग बदलला आहे.
  • चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लगतच्या किनारी भागात पावसाची शक्यता
  • असनी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क

Cyclone Asani : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा (Hurricane) मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) 'असनी' (Asani Cyclone) चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

चक्रीवादळ 'असनी' ने मार्ग बदलला

चक्रीवादळ 'असनी' ने आपला मार्ग बदलला आहे, या चक्रीवादळाला सामना करण्यासाठी अनेक राज्यांचे हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सक्रियपणे काम करत आहेत. पूर्व किनारपट्टीजवळ आल्यानंतर वादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे वादळ पूर्व किनार्‍याकडे सरकत असून, त्यामुळे बाधित भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून पाऊसही पडताना दिसत आहे. सोमवारी हे वादळ विशाखापट्टणमपासून 550 किमी दक्षिण-पूर्व, पुरीच्या दक्षिणेस 680 किमी होते. ते 100 ते 110 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. 

चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लगतच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत मच्छीमारांनी पुढील किमान दोन दिवस या भागात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी

चक्रीवादळ 'असनी' हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे 330 किमी अंतरावर असल्याने, मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 'असनी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे, त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता

आंध्र प्रदेशातील IMD ने माहिती दिली आहे की, आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास ते 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी