पतीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पत्नीनं उचललं 'हे' पाऊल 

एक व्यक्ति आपल्या ऑफिसमधल्या 14 वर्षींय मुलीवर अत्याचार करत होता. पत्नीनं त्याच्या केबिनमध्ये एक सीक्रेट कॅमेरा लावला आणि त्यानंतर जे फुटेज समोर आलं ते झोप उडवणारं होतं. 

Representative Image
पतीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पत्नीनं उचललं 'हे' पाऊल  (Source: Pixabay)  

मुंबईः  एका महिलेनं आपल्या पतीला एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडलं आहे. महिलेनं आपल्या पतीच्या ऑफिसच्या केबिनमध्ये एक सीक्रेट कॅमेरा लावला होता. ज्यात त्याच्या सर्व वाईट कृत्यं कैद झालं आहे. महिलेचा पती ऑफिसच्या केबिनमध्ये एक 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत होता. हे प्रकरण युकेमधलं आहे. 

पत्नीला पहिल्यापासून आपल्या पतीवर संशय होता. ज्यानंतर तिनं पतीच्या ऑफिश केबिनमध्ये एक सीक्रेट कॅमेरा इंस्टॉल केला होता. आधी जेव्हा याबाबतचा पुरावा मिळाला नव्हता तेव्हा तिला असं वाटत होती की, तिचा पती दुर्लक्ष करत आहे आणि तिच्यावर प्रेम करत नाही. मात्र या बाबतचा खुलासा करण्यासाठी तिनं त्याच्या केबिनमध्ये कॅमेरा लावला. त्यानंतर त्या कॅमेऱ्यात आलेला फुटेज पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

14 वर्षीय मुलीवर अत्याचार 

पत्नीनं कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पाहिलं की तिचा पती एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता. त्या मुलीसोबत पती अश्लील चाळे करताना कॅमेऱ्यात कैद झाला. महिलेनं पतीविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली. त्यानंतर कोर्टाच्या सुनावणीनंतर पतीला 6 वर्ष 9 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. 

पतीच्या बदलत्या वृत्तीवरून आला संशय 

पीडितीनं कोर्टात सांगितलं की, मला प्रत्येकवेळी असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काही तरी चुकीचं होत आहे. ज्याची मला काहीच भनक लागत नाही आहे. मी यावर खूप विचार केला पण मला काही समजत नव्हतं. मला माझ्या पतीच्या स्वभावात आणि वागण्यात काही बदल दिसू लागले. मी खूप रडली. मला खूप वाईट वाटलं आणि खूप दुःख झालं मला. मला आता त्याच्याबद्दल काही विचार करायचा नाही आहे. कारण जेव्हाही मला त्याच्या बद्दल विचार करते तेव्हा मला त्रास होता. 

कोर्टानं सुनावली 6 वर्षांची शिक्षा 

महिलेच्या पतीचं आणि त्या मुलीचं ऑफिसमध्ये अफेअर सुरू होते. तसंच त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होते. तो नेहमीच त्या मुलीवर अत्याचार करायचा. ऑफिसच्या त्याच्या बॉसनं देखील कोर्टात साक्ष देत म्हटलं की, तो आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या पत्नीचा फसवत होता. कोर्टानं सुनावणीदरम्यान म्हटलं की, एका अल्पवयीन मुलीसोबत सेक्शुअल बिहेवियर ठेवणं हा एक गंभीर गुन्हा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...