चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीची हत्या, आरोपी फरार

लोकल ते ग्लोबल
Updated May 20, 2020 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्लीच्या हर्ष विहारमध्ये एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची लाटण्याच्या सहाय्याने हत्या केल्याचे समोर आले आहे.

murder
लाटणाच्या मदतीने पतीने केली पत्नीची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पतीने लाटण्याच्या सहाय्याने केली पत्नीची हत्या
  • दिल्लीच्या ह्रर्ष विहार येथे घडली ही घटना
  • पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार

नवी दिल्ली : देशात सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांची स्थिती बिकट झाली आहे. हाताला काम नसल्याने पैसे नाहीत त्यामुळे अनेकांचे खाण्याचे हाल होत आहेत. अशातच दिल्लीमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नव्हे तर पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार झाला आहे.

ही घटना दिल्लीच्या ह्रर्ष विहार येथील आहे. रविवारी ही घटना घडली. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला लाटण्याच्या सहाय्याने जीवघेणी मारहाण केली. यानंतर आरोपीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी तिथून तात्काळ पळ काढला.

पती घ्यायचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय

आरोपी पती नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. मृत व्यक्तीची ओळख शिनाख्त सायमा अशी आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायमा आपल्या कुटुंबासह गल्ली नंबर १२, बी ब्लॉक, सबोली, हर्ष विहार येथे राहत होती. तिला पहिल्या नवऱ्यापासून चार मुले आहेत. तिच्या पहिल्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला होता.

सायमाचे दुसरे लग्न

दीड वर्षांपूर्वी सायमाने आफताब नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न केले होते. आफताब मोलमजुरी करून पोट भरत होता. सायमाचा पहिला नवरा गेल्यानंतर लाखो रूपये सायमाला मिळाले होते. याच कारणामुळे आफताबने तिच्याशी लग्न केले होते.

लग्नानंतर आफताब नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये भांडणेही होत. रविवारी दुपारी तो घरात होता. याचवेळेस सायमाचे आणि आफताबचे भांडण झाले. हे भांडण इतके टोकाला गेले की रागाच्या भरात आफताबने भयानक पाऊल उचलले. त्याने लहान मुलांसमोरच सायमाला लाटण्याच्या सहाय्याने मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपीने तिला उचलले आणि खाली आपटले. आफताबच्या अशा वागण्याने सायमा जागीच बेशुद्ध झाली. आरोपी इतकंच करून थांबला नाही तर त्याने तिची गळा दाबून हत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी