आधी 6 मुलांसमोर केली पत्नीची हत्या, नंतर कढईत टाकून गरम पाण्यात उकळला मृतदेह

पोलिसांनी बुधवारी शहरातील गुलशन-ए-इकबाल भागातील एका खासगी शाळेच्या किचनमधल्या कढईतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

Crime Against Women
धक्कादायक घटना 
थोडं पण कामाचं
  • एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची स्वतःच्याच सहा मुलांसमोर हत्या केली आहे.
  • नर्गिस असं मृत महिलेचं नाव आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजौर एजन्सी येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पती आशिक हा शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता.

कराची: अंगावर काटा येणारी एक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची स्वतःच्याच सहा मुलांसमोर हत्या केली आहे. याहून धक्कादायक गोष्ट म्हणजेच हत्या करून हा नराधम एवढ्यावर थांबला नाही तर, त्यानं पत्नीचा मृतदेह (wife's body) गरम पाण्यात उकळल्याची (boiled in hot water) धक्कादायक बाब समजतंय. ही घटना घडली आहे पाकिस्तानमधील (Pakistan) सिंध प्रांतात. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी बुधवारी शहरातील गुलशन-ए-इकबाल भागातील एका खासगी शाळेच्या किचनमधल्या कढईतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. नर्गिस असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजौर एजन्सी येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पती आशिक हा शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता.  जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेच्या सर्वेंट क्वार्टरमध्ये राहत होता.

अधिक वाचा-  मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा 

आधी उशीनं गळा दाबून केली हत्या 

जिओ न्यूजने जिल्हा पूर्वचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अब्दुर रहीम शेराजी यांच्या हवाल्यानं सांगितलं की, इतर तीन मुलांचा ताबा सध्या पोलिसांकडे आहे. एसएसपी शेराझी म्हणाले, या घटनेनंतर त्या मुलांना धक्का बसला आहे. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतेसाठी जिन्ना पदव्युत्तर वैद्यकीय केंद्रात नेला आहे. प्राथमिक तपासात आणि मुलांच्या जबाबावरून असं दिसून आलं की, आरोपीनं सुरूवातीला आपल्या पत्नीचा उशीनं गळा दाबून मारलं, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. 

अवैध संबंध ठेवण्यास पाडत होता भाग

पुढे अधिकाऱ्यानं सांगितलं की, मृत महिलेचा एक पाय ही तिच्या शरीरापासून वेगळा करण्यात आला आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, पतीने पत्नीला अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडलं आणि तिनं त्या गोष्टीसाठी नकार दिल्याने तिची हत्या केल्याचंही बोललं जात आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडल्यानंतरच या घटनेचा खुलासा होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी