होळीसाठी नवीन कपडे घेऊन देण्यास पतीनं दिला नकार, पत्नीनं उचललं 'हे' पाऊल 

उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात एक धक्कादायर घटना घडली आहे. या जिल्ह्यात एका निर्दयी आईनं आपल्या 6 महिन्याच्या मुलीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली आहे. हत्येचं कारण ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

Representative Image
नवीन कपडे न मिळाल्यानं आईनं घेतला 6 महिन्याच्या मुलीचा जीव 

अलीगढः उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात एक धक्कादायर घटना घडली आहे. या जिल्ह्यात एका निर्दयी आईनं आपल्या 6 महिन्याच्या मुलीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली आहे. हत्येचं कारण ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होळीला नवीन कपडे देण्यावरून महिलेचं आपल्या पतीसोबत भांडण झालं होतं. याच रागात तिनं आपल्या मुलीचा जीव घेतला. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला अटक केली आहे. 

आरोपी महिलेचं नाव पिंकी शर्मा (25) आहे. तिचा पती राहुल शर्मा एका टाळं बनवणाऱ्या कंपनीत काम करतो. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. या दाम्पत्याला एक 3 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी पिंकीचं राहुलसोबत भांडण झालं होतं. त्यांच्यामध्ये होळीच्या सणाला नवीन कपडे विकत घेण्यावरून वाद झाला. पिंकी राहुलकडून स्वतःसाठी आणि मुलांसाठी होळीला नवीन कपडे द्यावे अशी मागणी करत होती. राहुलनं पिंकीला नकार दिला. ज्यानंतर त्यांच्यातला वाद वाढला. पिंकीनं या वादाचा सर्व राग आपल्या 6 महिन्याच्या मुलीवर काढला. पिंकीनं रागाच्या भरात तिला इतकी मारहाण केली की, त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. 

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ बनविणार्‍या व्यक्तीने पिंकीला असे करण्यास का रोखलं नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. चिमुकलीच्या मृत्यूनंतर राहुलनं पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, पिंकीचं म्हणणं आहे की, मी आपल्या मुलीला मुद्दाम मारलं नाही. तिने सांगितले की तिच्या पतीशी भांडण झाल्यावर मला खूप राग आला होता आणि तो राग मी मुलीवर काढला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.नवीन कपडे न मिळाल्यानं आईनं घेतला 6 महिन्याच्या मुलीचा जीव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी