पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे पतीने कापले लिंग 

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 18, 2019 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचे लिंग कापल्या प्रकरणी पतीला आठ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा प्रकार एका महिन्यापूर्वी घडला होता. 

husband staring at jail time for chopping off penis of rapist who attacked his wife
पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे पतीने कापले लिंग  

थोडं पण कामाचं

  • बलात्काराचा प्रयत्न करणारा व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने त्रस्त होता
  • लिंग कापणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घरातून अटक केली. 
  • बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापले तेव्हा तो इतका विव्हळत होता की रात्रीच्या वेळी शेजारी त्याच्या आक्रोशाने जागे झाले

नवी दिल्ली :  एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापण्याची एक विचित्र घटना युक्रेनमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खारकिव्ह भागातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सेवचेकनकोव्ह खेड्यातील २७ वर्षीय दीमित्र स्पाकिन या व्यक्तीने आपल्या चाकूने दुसऱ्या व्यक्तीचे लिंग कापले आहे. 

या संदर्भात स्पाकिनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय दिमीक्षी इनचेनको हा माझ्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. आरोपी आणि त्याची पत्नी आपल्या काही मित्रासोबत एका स्थानिक रेस्टोरंटमध्ये पार्टीला गेले होते. यावेळी रात्री १ वाजता पत्नीने  पतीच्या १० मिनिटे अगोदर रेस्टोरंट सोडले. ती आपल्या घराकडे जात होती. त्यावेळी इनचेनको याने तिला छेडले आणि कमेंट केली. तिने त्याच्या कमेंटकडे दुर्लक्ष केले. पण त्याने तिचे तोंड आपल्या हातांनी दाबून जेवळत असलेल्या झुडपांमध्ये तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी स्पाकिनने सांगितले की, मी त्या ठिकाणी पोहचलो, त्यावेळी मला दिसले की माझ्या पत्नीचा गळा त्याने पकडला होता. आणि त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्याकडे धावला आणि त्याला मार दिला आणि आपल्या जवळ असलेल्या स्विस चाकूने त्याचे लिंग कापले. त्यानंतर स्थानिकांनी कथित बलात्कारी व्यक्तीला हॉस्पीटलमध्ये दाखल केले.  या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लिंग कापल्यानंतर कथित बलात्कार करणारा व्यक्ती इतक्या जोरात ओरडत होता की आसपासचे सर्व शेजारी काळोखात उठून घटनास्थळी आले. 

घटनेनंतर पतीने चाकू त्या ठिकाणी टाकला आणि १३ किलोमीटरवर असलेल्या जवळच्या पोलिस स्टेशमध्ये स्वतःच दाखल झाला. स्थानिक पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार स्पाकिन यांना सांगितले की, मी सांगू शकत नाही, मला त्या क्षणी काय झाले होते. 

दरम्यान, जखमी व्यक्तींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तीवर दीर्घ उपचाराची गरज आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे लिंग पुन्हा जोडले जाणार की नाही या बाबत अजून शाशंकता आहे. नैराश्य आलेल्या इनचेनको याला आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेक अप झाला होता. त्याने घटनेवेळी एक लिटर व्होडका प्यायला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी