बंगळुरू : हुंडा दिला नाही म्हणून अनेक महिलांची हत्या झाली आहे तर काहींना घटस्फोट द्यावा लागला आहे. परंतु बंगळुरूमध्ये (Bangalore) घडलेल्या एका घटनेमुळे एका महिलेच्या (Women) अब्रुची लंक्तरे वेशीवर टांगण्यात आली आहेत. ही घाण कृत्य दुसरं कोणी नाही तर खुद्द तिच्या नवऱ्यानं केलं आहे. पत्नीने (Wife) हुंडा देण्यास नकार दिल्यानं तिच्या नवऱ्यानं तिचे त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडिया(Social media) आणि आपल्या मित्रांकडे व्हायरल केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ज्यूसमध्ये मिसळलेले नशा प्यायल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली होती तेव्हाची छायाचित्रे क्लिक केली होती. बेंगळुरूच्या कनकापुरा रोड येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने या संदर्भात बसवनगुडी महिला पोलिस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडितेने सांगितले की, तिने 2013 मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि आरोपीच्या प्रेमात पडत त्याच्याशी लग्न केले होते. दरम्यान काही काळ हे दोघांनी चांगले जीवन व्यतीत केल्यानंतर पतीनं हुंड्याची मागणी करत पीडितेला त्रास देणं सुरू केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने नुकतेच निधन झालेल्या तिच्या वडिलांचे सर्व पैसे त्याच्याकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणी तो व्यक्ती करत होता. नशेत असताना पीडितेचे फोटो क्लिक केल्यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, जर पैसे नाही दिले तर तो तिचा फोटो व्हायरल करेल.
महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पीडितेला आपल्या मित्रासोबत झोपण्यासाठी तिचा छळ करत असायचा, असा आरोप तिने आपल्या फिर्यादीत केला आहे. पीडितेने मागण्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपीने तिचे फोटो आपल्या मित्रांना पाठवले आहेत. दरम्यान,पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.