Crime: राणीपेट (तामिळनाडू): तामिळनाडूतील राणीपेठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 29 वर्षीय महिलेने झोपेत असणाऱ्या आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम पाणी ओतल्याचा आरोप आहे. महिलेला तिचा पती बाहेरख्यालीपणा करत असल्याचा संशय होता. त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील एका गावातील आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून संपूर्ण तपास सुरू केला आहे.
प्रायव्हेट पार्ट 50 टक्के जळाला
श्रीपेरुंबदूर येथील एका खासगी कंपनीचे ३२ वर्षीय पर्यवेक्षक एल थंगराज यांचं शरीर ५० टक्के भाजले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, थंगाराज यांना सुरुवातीला वालाजाह सरकारी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. टी प्रिया (वय २९ वर्ष) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
अधिक वाचा: Mumbai Crime: मसाजसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं अन् मग घडलं असं की....
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 294 (b) (अश्लील कृत्ये आणि गाणी), 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे), 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 506(ii) (जर मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाली असेल). अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.
अधिक वाचा: Jammu Kashmir: एकाच घरातून सापडले कुजलेल्या अवस्थेतले 6 मृतदेह, पोलीस गुंतले तपासात
पतीचे अनैतिक संबंध असल्याचा होता संशय
जेव्हा पत्नीची खात्री पटली की, तिच्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, तेव्हा त्यांच्यात वाद सुरु झाले. हळूहळू ही भांडणं अधिक वाढू लागली. शनिवारी देखील थंगराज आणि त्याची पत्नी टी. प्रिया यांच्यात जोरदार भांडण झालं. भांडणानंतर थंगराज नंतर झोपी गेला. त्याचवेळी पहाटेच्या सुमारास प्रियाने बाथरुमच्या गिझरचे गरम पाणी बादलीत भरले आणि हेच उकळलेलं गरम पाणी थेट पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं. थेट अंगावर उकळतं पाणी पडल्याने थंगराज क्षणार्धात जागा झाला. यावेळी थंगराजने मदतीसाठी प्रचंड आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये थंगराजचा प्रायव्हेट पार्ट हा पन्नास टक्के भाजला असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.