2019 Hyderabad Gang Rape : हैद्राबाद बलात्कार आरोपींचा एन्काऊंटर फेक, पोलिसांवर खुनाचा खटला दाखल करण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची शिफारस

2019 Hyderabad Gang Rape  हैद्राबादमध्ये २०१९ साली बलात्कार आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. हा एन्काऊंटर खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने म्हटले आहे. तसेच आरोपींचा खून केल्याप्रकरणी १० पोलीस कर्मचार्‍यांविरोधात खुनाचा खटला दाखल करावा अशी शिफारस या समितीने केले आहे.

Hyderabad encounter
हैद्राबाद एन्काऊंटर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हैद्राबादमध्ये २०१९ साली बलात्कार आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता.
  • हा एन्काऊंटर खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने म्हटले आहे.
  • तसेच आरोपींचा खून केल्याप्रकरणी १० पोलीस कर्मचार्‍यांविरोधात खुनाचा खटला दाखल करावा अशी शिफारस या समितीने केले आहे.

2019 Hyderabad Gang Rape : नवी दिल्ली : हैद्राबादमध्ये २०१९ साली बलात्कार आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. हा एन्काऊंटर खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने म्हटले आहे. तसेच आरोपींचा खून केल्याप्रकरणी १० पोलीस कर्मचार्‍यांविरोधात खुनाचा खटला दाखल करावा अशी शिफारस या समितीने केले आहे. आरोपींनी पोलिसांची बंदूक खेचली आण पळून गेले ही बाब विश्वास न ठेवण्यासारीख नाही, याचा कुठलाच पुरावा नसल्याचेही समितीने म्हटले आहे. (Hyderabad encounter was fake says sc panel case against 10 police)

हैद्राबादमध्ये झालेल्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. या समितीने आपला अहवाल वरिष्ठ न्यायालयाला सादर केला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना जिवे मारण्यासाठीच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असे समितीने म्हटले आहे.

महिला डॉक्टरवर बलात्कार आणि खून

२०१९ मध्ये हैद्राबादमध्ये एका महिला डॉक्टरवर चार आरोपींनी अपहरण करून बलात्कार केला होता. तसेच पीडितेला जाळून मारून टाकले होते. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आरिफ, चिंताकुंटा चेन्नाकेशवुलु, जोलू शिवा आणि जोलू नवीन या चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर ६ डिसेंबर २०१९ रोजी या आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी