कोरोना काळात प्रचंड कमाई करणाऱ्या 'डोलो-६५०'च्या निर्मात्या मायक्रो लॅबच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड

I-T Dept raids Dolo-650 manufacturer Micro Lab's office in Bengaluru : 'डोलो-६५०'ची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब या कंपनीने कोरोना काळात प्रचंड कमाई केली. आता संकट नियंत्रणात येताच आयकर विभागाने मायक्रो लॅब कंपनीच्या उत्पन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे.

I-T Dept raids Dolo-650 manufacturer Micro Lab's office in Bengaluru
कोरोना काळात प्रचंड कमाई करणाऱ्या 'डोलो-६५०'च्या निर्मात्या मायक्रो लॅबच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोरोना काळात प्रचंड कमाई करणाऱ्या 'डोलो-६५०'च्या निर्मात्या मायक्रो लॅबच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड
  • 'डोलो-६५०'ची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब या कंपनीने कोरोना काळात प्रचंड कमाई केली
  • आयकर विभागाने मायक्रो लॅब कंपनीच्या उत्पन्नाची कसून तपासणी सुरू केली

I-T Dept raids Dolo-650 manufacturer Micro Lab's office in Bengaluru : कोरोना काळात ताप आल्यास तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप आल्यास घेण्याचे औषध म्हणून भारतात 'डोलो-६५०' ही गोळी लोकप्रिय झाली. 'डोलो-६५०'ची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब या कंपनीने कोरोना काळात प्रचंड कमाई केली. आता संकट नियंत्रणात येताच आयकर विभागाने मायक्रो लॅब कंपनीच्या उत्पन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे. आयकर विभागाने मायक्रो लॅब कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ठोस माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे.

आयकर विभागाच्या २० जणांच्या पथकाने बंगळुरूत मायक्रो लॅब कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. याआधी बुधवार ६ जुलै २०२२ रोजी कंपनीशी संबंधित ४० ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकून तपासणी सुरू केली. कंपनीच्या वेगवेगळ्या राज्यांतील कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी झाली. आज कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे तपासणी सुरू झाली. कंपनीचे सीएमडी दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या घरांवर पण आयकर विभागाची धाड पडली आहे.

कंपनीने कोरोना संकट सुरू झाल्यावर २०२० या एकाच वर्षात ३५० कोटी 'डोलो-६५०' गोळ्यांची विक्री केली होती. सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत ४०० कोटींचा महसूल गोळा केला होता.

भारतात चॉकलेट म्हणजे कॅडबरी, शुद्ध पाणी म्हणजे बिसलेरी, पेपरची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स असे झाले आहे. ब्रँडची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. याच पद्धतीने 'डोलो-६५०' ही गोळी पॅरासिटामॉल गोळीची जागा घेऊ लागली आहे. ताप आला तर ही गोळी हमखास घेतली जाऊ लागली आहे. पण या वाढत्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन कर द्यावा लागू नये म्हणून कागदपत्रांमध्ये गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळेच तपासणीसाठी आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) कारवाई सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी