Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही- संजय राऊत 

Sanjay Raut Press conference  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.  काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही. गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५ वी दिल्ली भेट आहे.

I will not be surprised if there is another change of power in Maharashtra say Sanjay Raut
पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य नाही - राऊत 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
  •  काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही
  • . गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५ वी दिल्ली भेट आहे.

Raut on Eknath Shinde, नवी दिल्ली  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.  काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही. गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५ वी दिल्ली भेट आहे.  महाराष्ट्रातले मुख्यमंत्री हे वर्षातून ४ वेळा ही दिल्लीला आले नाही आहेत. आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला महिन्यातून ५ वेळा यायला लागत आहे, यामुळे  महाराष्ट्राच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.  (I will not be surprised if there is another change of power in Maharashtra say Sanjay Raut)

अधिक वाचा : सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

शिवसेनेचे मुख्यमंत्री जर कोण म्हणून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावे लागले नाही. शिवसेनेचे हाय कमांड हे कायम मुंबई मध्येच राहिले आहे. दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते.  मंत्री मंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही. एक महिना झाला तरी दोघांचेच कॅबिनेट आहे, असाही टोला राऊत यांनी लगावला आहे. 

अधिक वाचा :  जुलाबात (डायरिया) फक्त या गोष्टींचे सेवन करा

महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्यांपासून खेळ खंडोबा सुरू आहे.  या गटाने शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. १६ आमदार अपात्र ठरतील.  स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होतात लागेल, मग ते स्वतः ला शिवसैनिक कसे म्हणवणार, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. 

अधिक वाचा : 'या' वयात चुकूनही पिऊ नका दारू, अन्यथा...

शिवसेना सगळ्या निवडणुका लढेल.

भाजपला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. सतत मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यावं लागतं आहे, यातच महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाला ठेच लागत आहे. ते सरकार अद्याप बनवू शकले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी