भारत-चीन सीमेजवळच्या राज्यात क्रॅश लँडिंग

IAF Mi-17 helicopter today crash-landed in eastern Arunachal Pradesh भारत-चीन सीमेजवळ असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या एमआय १७ हेलिकॉप्टरने क्रॅश लँडिंग केले. हेलिकॉप्टरचे दोन्ही वैमानिक आणि तीन क्रू सदस्य असे हवाई दलाचे पाच जण सुरक्षित आहेत.

IAF Mi-17 helicopter today crash-landed in eastern Arunachal Pradesh
भारत-चीन सीमेजवळच्या राज्यात क्रॅश लँडिंग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत-चीन सीमेजवळच्या राज्यात क्रॅश लँडिंग
  • एमआय १७ हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग
  • हेलिकॉप्टरचे दोन्ही वैमानिक आणि तीन क्रू सदस्य असे हवाई दलाचे पाच जण सुरक्षित

IAF Mi-17 helicopter today crash-landed in eastern Arunachal Pradesh । नवी दिल्ली: भारत-चीन सीमेजवळ असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या एमआय १७ हेलिकॉप्टरने क्रॅश लँडिंग केले. हेलिकॉप्टरचे दोन्ही वैमानिक आणि तीन क्रू सदस्य असे हवाई दलाचे पाच जण सुरक्षित आहेत. नियमानुसार हवाई दलाने क्रॅश लँडिंग करण्याची वेळ का आली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर नियमानुसार कारवाई होईल.

प्रशिक्षणासाठी एमआय १७ हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि तीन क्रू सदस्य असे हवाई दलाचे पाच जण होते. या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशमध्ये क्रॅश लँडिंग केले. क्रॅश लँडिंग झाले तरी हेलिकॉप्टरमध्ये बसलेले सर्वजण सुरक्षित आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली.

याआधी २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एका एमआय १७ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. 

भारतीय हवाई दलाचे एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला होता. हा अपघात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. भारत-चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यांगस्ते पोस्ट आहे. या पोस्टपासून काही किमी दूर भारताच्या हद्दीत एके ठिकाणी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. यावेळी कंटेनरला हेलिकॉप्टरचा पंखा आपटला आणि अपघात झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी