IPS Success story: लाखों तरूणांचे प्रेरणास्रोत आहे यूपीचे DGP ओ. पी. सिंह, आईने शेती करून मुलाला बनवले IPS

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2019 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPS Success story:  IPS ऑफिसर ओ. पी. सिंह सध्या यूपीमध्ये डीजीपी पदावर कार्यरत आहेत. आयपीएस आणि डीजीपीपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप अडचणींनी भरलेला आहे. पण त्यांनी परिस्थितीशी सामना करत स्वतःला मजबूत बनवले. 

o p singh
ओ पी सिंह  

IAS IPS Success story of DGP UP OP Singh: यूपी कॅडरच्या १९८३ बॅचचे आयपीएस ऑफिसर ओ पी सिंग म्हणजे ओम प्रकाश सिंह याची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. संघर्षापूर्ण जीवनात ओ. पी. सिंह यांनी कधीही परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही. विपरित परिस्थितीशी सामना करत आपली वेगळी ओळख बनवली. त्यांनी सुरूवातीचे शिक्षण हे गया येथे झाले आहे. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी रांची येथे घेतले. या ठिकाणी त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. 

बिहारच्या गया जिल्ह्यात राहणाऱ्या आयपीएस ऑफिसर ओ. पी. सिंह आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी केंद्रात आणि यूपीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या आहेत. १९९३ मध्ये त्यांना शौर्यासाठी इंडियन पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले. या शिवाय १९९९ आणि २००५ मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार ओ. पी. सिंह यांच्या यशात त्यांच्या आईचा हात खूप महत्त्वाचा आहे. ओ. पी. सिंह यांच्या आयुष्यात एक असा काळ होता की त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना हादरवून टाकले होते. 

वडिलांच्या मृत्यूनंतर आई वाईट पद्धतीने कोसळली होती. त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली. वडिलांच्या निधनानंतर घर चालविण्यासाठी बँकेत केवळ६०३ रूपये होते. त्यावेळी ओ. पी. सिंह यांच्या आईला कळत नव्हते की घर कसे चालवायचे. त्यांनी स्वःला सांभाळले आणि शेती करण्याचा निर्णय घेतले. ओ. पी. सिंह यांच्या आईने यापूर्वी कधीही घराच्या बाहेर पाय ठेवला नव्हता. पण परिस्थितीमुळे त्यांनी अनेक वर्ष शेती केली. शेतीच्या माध्यमातून येणाऱ्या थोड्याफार पैशातून ओ. पी. सिंह आणि त्या भावंडांना शिक्षण दिले.  ओ. पी. सिंह यांच्या जीवनात हे असे तब्बल १० वर्ष सुरू होते. 

कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होते ओ. पी. सिंह

ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ओ. पी. सिंह यांनी दिल्ली विद्यापीठात एमएचे शिक्षण सुरू केले. शिक्षणात ओ. पी. सिंह यांना गती होती. ओ. पी. सिंह यांनी दिल्ली विद्यापीठात गोल्ड मेडल  पटकावले आहे. या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेही आहे. त्यानंतर कुटुंबाच्या अडचणी दूर होण्यास सुरूवात झाली. ओ. पी. सिंह हे एक असे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांना वर्ल्ड लेव्ह सिक्युरिटी टेक्नॉलिजीची जाण आहे.  ते सर्वात श्रेष्ठ पदावर जास्त काळ राहणारे देशातील सातवे ऑफिसर आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPS Success story: लाखों तरूणांचे प्रेरणास्रोत आहे यूपीचे DGP ओ. पी. सिंह, आईने शेती करून मुलाला बनवले IPS Description: IPS Success story:  IPS ऑफिसर ओ. पी. सिंह सध्या यूपीमध्ये डीजीपी पदावर कार्यरत आहेत. आयपीएस आणि डीजीपीपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप अडचणींनी भरलेला आहे. पण त्यांनी परिस्थितीशी सामना करत स्वतःला मजबूत बनवले. 
Loading...
Loading...
Loading...