IAS Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास, भावाच्या निधनानंतर उचलले हे पाऊल 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

IAS Success Story: सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC परीक्षा पास होणे काही साधी गोष्ट नाही आहे. पण जैसलमेरच्या देशल दानने केवळ कमी वयात नाही तर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास करण्याची किमया केल

deshal dan
आयएएस अधिकारी देशल दान 

IAS Success Story Deshal Dan: जैसलमेरच्या सुमालियाई गावात राहणाऱ्या देशल याने २०१७ मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या ठिकाणी पोहचणे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा काही कमी गोष्ट नव्हती. देशल हा आपल्या ७ भाऊ-बहिणींमध्ये दुसरा शिकलेला मुलगा आहे. त्याने आयआयटी जबलपूर येथून बीटेक पूर्ण केले. देशलला आयएएस बनण्याची प्रेरणा त्याचा मोठ्या भावाकडून मिळाली आहे. 

देशलनुसार तो जेव्हा दहावीत होता तेव्हा त्याचा मोठा भाऊ इंडियन नेव्हीमध्ये सेवेत होता. देशलच्या भावाचा सेवेत असताना मृत्यू झाला. त्याचा भाऊ नेहमी लष्कराच्या गोष्टी सांगायचा. भाऊ त्याला नेहमी सांगायचा की तू भारतीय लष्करात काम कर नाही तर प्रशासकीय सेवेत जा. देशल आपल्या भावाकडून प्रेरित होऊन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

द बेटर इंडियानुसार देशलने ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली. देशल २०१७ मध्ये IFS ची पाचवी रँक आणि २०१८ मध्ये IAS AIR ८२ वी रँकिंग मिळवली. घरात देशलचे आई वडील तर नाहीच नाही पण त्याचे छोटे भाऊ-बहिणही शिकलेले नाही. भावांनी खूप कमी वयात काम करणे सुरू केले आहे. 

छोट्या चहाच्या दुकानातून चालत होता घराचा खर्च 

देशलचे घऱ खूपच सामान्य आहे. वडिलांचे चहाचे स्टॉल आहे. देशलनुसार त्यांच्याकडे शेतजमीन आहे. पण त्यातून आम्हांला काहीच उत्पन्न मिळत नव्हते. अनेक वर्ष शेतीवर गुजराण केल्यानंतरही परिस्थिती बदलत नाही हे पाहून  १९८९ मध्ये वडिलांनी एक टी स्टॉल टाकण्याचा निर्णय घेतला. देशलनुसार त्याच्या जन्मापूर्वी वडील वर्षातून एक दोनवेळी शेती करायचे. त्यातूनचे घरच्यांची पोटं भरतील इतके उत्पन्न व्हायचे. माझा मोठा भाऊ वडिलांना त्यांच्या चहाच्या स्टॉलवर मदत करायचा. पण मला पहिल्यापासूनच माहिती होते की मला यापेक्षा काहीतरी मोठे पाहिजे आहे. 

वडिलांनी दाखवला देशलवर भरवसा 

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार आयएएस अधिकारी त्यांच्या विचारांच्या आणि आवाक्याच्या बाहेर आहे. देशल नेहमी सांगायचा की मी जे पण काही बनेल ते तुमच्या आवाक्याच्या बाहेर असणार आहे. इतके नाही देशलला त्याचे वडील काम करू देत नव्हते. त्याच्या वडिलांचे मत होते की देशलचे साहस आणि दृढ संकल्प त्याला या ठिकाणी पोहचविले आहे. देशल म्हणाला की मला माझ्यावर विश्वास नसता तर मी गावात शेती किंवा इतर कोणतेही काम करताना दिसलो असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAS Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास, भावाच्या निधनानंतर उचलले हे पाऊल  Description: IAS Success Story: सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC परीक्षा पास होणे काही साधी गोष्ट नाही आहे. पण जैसलमेरच्या देशल दानने केवळ कमी वयात नाही तर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास करण्याची किमया केल
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles