वयस्कर व्यक्तींना कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी बीसीजी लस फायदेशीर - आयसीएमआर

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 29, 2020 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

BCG vaccine: वयस्कर लोकांना कोरोनाच्या होणाऱ्या संसर्गापासून रोखण्यासाठी बीसीजी लस फायदेशीर ठरू शकते असे विधान आयसीएमआरने केले आहे.

corona
वयस्कर व्यक्तींना कोरोनापासून रोखण्यासाठी ही लस फायदेशीर 

थोडं पण कामाचं

  • बीसीजी लस आता कोरोना व्हायरसविरोधात फायदेशीर ठरू शकते.
  • बीसीसी लसीचे निकाल जाणून घेण्यासाठी अद्याप क्लिनिकल चाचणी सुरू आहे
  • संपूर्ण जग सध्या कोरोनासारख्या व्हायरसविरोधात लढत आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसविरोधातील लढाईबाबत आयसीएमआरने दिलासादायक बातमी दिली आहे. ट्युबरक्लोसिस(टीबी अथवा क्षय रोग) पासून बचावासाठी वापरले जाणारे बीसीजी लस आता कोरोना व्हायरसविरोधात फायदेशीर ठरू शके. वयस्कर व्यक्तींमध्ये याचा चांगला परिणाम अधिक दिसून आला. आयसीएमआरच्या शास्त्रांनी याला दुजोरा दिला आहे. 

शास्त्रज्ञ बीसीजी लसीच्या परिणामाबाबत टी सेल्स, बी सेल्स, श्वेत रक्त पेशी आणि डेंड्रिटीक सेल प्रतिक्षाबाबत सातत्याने संशोधन करत आहे. याशिवाय एखाद्या निरोगी वयस्कर व्यक्ती ज्यांचे वय ६० ते ८० दरम्यान आहे त्यांच्यातील अँटीबॉडीचा स्तर किती आहे हे ही पाहतआहे. 

६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे अथवा कोमोरबिडीटीज सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या वयस्कर लोकांना कोरोना व्हायरसचाधोका अधिक असतो. बीसीजीची लस ही केंद्र सरकारच्या यूआयपी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांना दिली जाते. याला ५० वर्षांपूर्वी लाच करण्यात आले होते. भारतीय शोध अनुसंधान परिषदेने आपल्या एका विधानात म्हटले की, आयसीएमच्या शास्त्रज्ञांना हे आढळले की बीसीसी लस ही मेमरी सेल्स प्रतिक्रियांना प्रेरित करते तसेच यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये अँटी बॉडीज तयार होतात. 

जुलै ते सप्टेंबरदरम्यान हे संशोधन करण्यात आले. यात ८६ लोकांचा समावेश होता. ज्यात ५४ जणांना ही लस देण्यात आली आणि ३२ जणांना दिली नाही. लसीकरणाच्या एक महिन्यानंतर लस दिलेल्या व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. बीसीसी लसीचे निकाल जाणून घेण्यासाठी अद्याप क्लिनिकल चाचणी सुरू आहे. याआधी केलेल्या संशोधनात सांगण्यात आले की इंडोनेशिया, जपानआणि युरोपमध्ये बीसीजी लसीने श्वसनासंबंधीच्या आजारांपासून वयस्कर व्यक्तींना सुरक्षित ठेवले. 

संपूर्ण जग सध्या कोरोनासारख्या व्हायरसविरोधात लढत आहे. अद्याप यावर लस सापडलेली नाही. जगातील सर्वच देश या लसीचे संशोधन करत आहेत. काहीं देशांनी क्लिनिकल चाचणी सुरू केली असून लवकरच यावर लस येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कोरोना व्हायरसने कोट्यावधी लोकांचे बळी घेतलेत. चीनमधून या व्हायरसच्या प्रसाराला सुरूवात झाली होती. दरम्यान, अद्याप जगात अनेक देशांमध्ये बरेचसे व्यवहार ठप्पच आहेत. भारतातही हळू हळू व्यवहार सुरू केले जात आहेत. टप्प्याटप्प्याने काही व्यवहार तसेच दळणवळण सुरू केले जात आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी