ICSE 10th Result announced: आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर (ICSE class 10th result declared) झाला आहे. या परीक्षेत एकूण चार विद्यार्थ्यांनी टॉप केलं आहे. यामध्ये पुण्यातील हरगुण कौर हिचा सुद्धा समावेश आहे. यंदाच्या वर्षी १०वीच्या परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. सर्व विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.
यंदाच्या परीक्षेत जे चार विद्यार्थी अव्वल आले आहेत त्यामध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुण्यातील हरगुन कौर मथारू (Hargun Kaur Matharu), अनिका गुप्ता, (Anika Gupta), पुष्कर त्रिपाठी (Pushkar Tripathi) आणि कनिष्क मित्तल (Kanishka Mittal) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी ४९९ मार्क्स मिळवले आहेत.
ICSE Class 10th results for 2022 declared; pass percentile 99.97% pic.twitter.com/L1QN7h3GAT — ANI (@ANI) July 17, 2022
रँक | विद्यार्थ्याचे नाव | मार्क्स |
१ | हरगुन कौर मथारू | ४९९ |
१ | अनिका गुप्ता | ४९९ |
१ | पुष्कर त्रिपाठी | ४९९ |
१ | कनिष्का मित्तल | ४९९ |
हे पण वाचा : अचानक ट्रॅकवर पडला व्यक्ती,तितक्यात वेगाने आली ट्रेन आणि...
विद्यार्थी एसएमएसद्वारे आपल्या आयसीएसई दहावीच्या बोर्डाचा निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला बोर्ड आयडी क्रमांक टाईप करावा (ICSE टाईप करुन सात अंकी आयडी टाईप करा) आणि त्यानंतर तो एसएमएस ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमच्या मोबाइलवर परीक्षेचा निकाल दिसून येईल.
CISCE बोर्डाने CBSE प्रमाणेच यंदाच्या वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा आयोजित केली होती. दोन्ही सेमिस्टरचे निकाल एकत्रित केल्यावर ICSE चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पहाता येणार आहे. तर मार्कशिट शाळेतून मिळेल.