10th, 12th Result : ICSE बोर्डाच्या दहावी- बारावीचा निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा

ICSE Class 10th, 12th Result : आयसीएसई बोर्डाच्या (ICSE ) दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. ऑफिशिअल वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नएसएमएसद्वारे  (SMS)देखील रिझल्ट पाहता येऊ शकतो.

icse result 2022 Update icse will soon release icse isc board term 1 result on official websie and get result on sms Education news in marathi
ICSE बोर्डाच्या दहावी- बारावीचा निकाल इथे तपासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ICSE  दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लवकरच
  • बातमीतील स्टेप्स फॉलो करुन पाहा रिझल्ट
  • SMSद्वारे देखील पाहता येणार निकाल

ICSE Result 2022 Official link : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट(ICSE) तर्फे लवकरच ICSE म्हणजे दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. ICSE टर्म १ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ICSE या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे १५ जानेवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर निकाल तपासू शकतात.

ICSE ने निकालाची निश्चित फायनल तारीख जाहीर केलेली नाही. या आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही.  केवळ कॉम्प्युटरद्वारे तयार केलेल्या मार्कशीटमधील विद्यार्थ्यांचे गुण दिसतील, हे पालक आणि विद्यार्थी यांनी ध्यानात घ्यावे. 

Also Read : ​CBSE Class 10th, 12th Term 1 Result 2022 :  10-12वीचा लवकरच येऊ शकतो निकाल , असे तपासा रिझल्ट, टर्म 2 परीक्षेची ही आहे अपडेट तारीख 

ICSE च्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याना कॉम्प्युटरद्वारे तयार केलेली मार्कशीट दाखवली जाणार आहे.  या गुणपत्रिकेवर केवळ सेमिस्टर १ च्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रत्येक विषयातील/पेपरमध्ये मिळवलेले मार्क असतील. संपूर्ण निकाल उदा.- पास सर्टिफिकेट दिलेले / पास सर्टिफिकेट न दिलेले / कंपार्टमेंट परीक्षेसाठी पात्र केवळ सेमिस्टर २ परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच घोषित केले जातील.

Also Read : SSC & HSC Exam : दहावी, बारावीची परीक्षेबाबत मोठी अपडेट, मंडळाने सुरू केली तयारी

ICSE, ISC Term-1 Result 2022: असा तपासा रिझल्ट 

  1. स्टेप १: अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर जा.
  2. स्टेप २: ICSE/ISC Result 2022 लिंकवर क्लिक करा. (सक्रिय झाल्यावर..)
  3. स्टेप ३: वर्ग, युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि स्वय जनरेटेड कोड यासह आवश्यक तपशील भरा.
  4. स्टेप ४: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या.


SMS द्वारे निकाल असा तपासा ICSE, ISC Term-1 Result 2022 रिझल्ट

इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन २०२२ च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल खालील स्टेप्स फॉलो करुन एसएमएसद्वारे देखील कळू शकतात.
ICSE टर्म १ निकाल तुमच्या मोबाइलवर मिळविण्यासाठी ICSE किंवा ISC टाइप करुन ९२४८०८२८८३ वर एसएमएस करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी