ICSI CSEET नोव्हेंबर परीक्षेचा निकाल जाहीर, या ठिकाणी तपासा निकाल 

ICSI CSEET Result 2021 : इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे सीएसईईटी निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. बातमीत खाली दिलेल्या स्टेप्स योग्य रित्या फॉलो करुन निकाल मिळवू शकतात.

icsi cseet result 2021 icsi cseet november exam result declared check result on official website
ICSI CSEET नोव्हेंबर परीक्षेचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ICSI CSEET निकाल जाहीर
  • बातमीतील स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती

ICSI CSEET Result 2021: इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे (Institute of Company Secretaries of India, ICSI) सीएसईईटी निकाल घोषित करण्यात आला आहे. आयसीएसआयतर्फे नोव्हेंबर सत्राच्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ICSI CSEET परीक्षेच्या निकालाची लिंक सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. (icsi cseet result 2021 icsi cseet november exam result declared check result on official website)

ICSI CSEET परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या एक दिवस अगोदर  ICSI ने विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्न समजण्यासाठी मॉक टेस्टचे आयोजन केले होते. यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेला बसलेले उमेदवार आपल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने निकाल पाहू शकतात. यासाठी उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

ICSI CSEET Result 2021: असा तपासा निकाल

उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu. वर जा.

होमपेजवर 'CSEET नोव्हेंबरचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

नोंदणी क्रमांकासह तुमच्याकडे मागितलेले क्रेडेन्शियल्स भरा आणि लॉगिन करा.

ICSI CSEET Result 2021 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा.

महत्वाची माहिती

निकालासोबत प्रत्येक उमेदवाराच्या गुणांचा विषयवार तपशील ICSI द्वारे प्रसिद्ध केले जाईल. हा तपशील उमेदवारांना पोस्टाने पाठविण्यात येणार नाही. ही संपूर्ण माहिती डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.

ICSI CSEET निकाल २०२१ च्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटवरील अपडेट पाहणे गरजेचे आहे.


स्कोअर कार्ड पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी