तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील संग्रहालयात

idols stolen from Tamilnadu temple found in US museum : तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये सापडल्या आहेत. 

idols stolen from Tamilnadu temple found in US museum
तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील संग्रहालयात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील संग्रहालयात
  • तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये सापडल्या
  • सर्व मूर्ती सुरक्षित आणि सुस्थितीत

idols stolen from Tamilnadu temple found in US museum : प्राचीन मूर्ती चोरणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किंमतीला विकणे हा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे. चोरलेल्या प्राचीन मूर्ती सापडण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. पण ताज्या घटनेत तामीळनाडूतील मंदिरातून चोरलेल्या मूर्ती अमेरिकेतील वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये सापडल्या आहेत. 

तामीळनाडूतील कुंभकोणममधील सुंदरा पेरुमलकोविल गावातील अरुल्मिगु सौंदराराजा पेरुमल मंदिर येथून कलिंगनाथन कृष्ण तसेच आणखी दोन प्राचीन मूर्तींची चोरी झाली होती. या सर्व प्राचीन मूर्ती अमेरिकेतील वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये सापडल्या आहेत. सर्व मूर्ती सुरक्षित आणि सुस्थितीत आहेत.

चित्रविचित्र पुतळे

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

कलिंगनाथन कृष्ण, विष्णू आणि श्रीदेवी या तीन देवतांच्या कांस्य मूर्तींची (ब्राँझच्या मूर्ती) तामीळनाडूतील मंदिरातून चोरी झाली होती. या तिन्ही मूर्ती अमेरिकेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यानंतर अमेरिकेतील सर्व संग्रहालये आणि लिलावगृहांमधून चौकशी सुरू झाली. अखेर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील आशियाई कला संग्रहालय येथे कलिंगनाथन कृष्ण ही कांस्य मूर्ती (ब्राँझची मूर्ती) सापडली. विष्णूची कांस्य मूर्ती (ब्राँझची मूर्ती) किम्बेल कला संग्रहालय तर श्रीदेवीची कांस्य मूर्ती (ब्राँझची मूर्ती) हिल्स ऑक्शन गॅलरी फ्लोरिडा येथे सापडली. तामीळनाडूतील मंदिरातून चोरी झालेल्या मूर्तींच्या वर्णनाशी सापडलेल्या मूर्तींची तुलना करण्यात आली. तामीळनाडूतून चोरलेल्या मूर्तींची ओळख पटली. यानंतरच अमेरिकेतील तपास यंत्रणेने तामीळनाडू पोलिसांशी संपर्क साधून चोरी झालेल्या मूर्ती सापडल्याचे कळवले.

काय आहे चोरीचे प्रकरण?

तामीळनाडूतील कुंभकोणममधील सुंदरा पेरुमलकोविल गावातील अरुल्मिगु सौंदराराजा पेरुमल मंदिर येथून कलिंगनाथन कृष्ण, विष्णू आणि श्रीदेवी या तीन देवतांच्या कांस्य मूर्तींची (ब्राँझच्या मूर्ती) चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्याने १२ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार केली. पोलीस तपासात लक्षात आले की, मूर्तींची चोरी सहा ते सात दशकांपूर्वी झाली होती. चोरट्यांनी डुप्लीकेट मूर्ती मंदिरात ठेवून चोरी लपविण्याचा प्रयत्न केला होता. पण काही वर्षांनंतर चोरी उघड झाली. पोलिसांनी तरीही तपास सुरू ठेवला आणि मंदिरातून चोरलेल्या प्राचीन मूर्ती अमेरिकेत सापडल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी