पाक व्याप्त काश्मिरातून इमरान खानची भारताला युद्धाची धमकी

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 17:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

गोंधळलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारताची असणार आहे. 

imran khan
इमरान खान   |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पाक पंतप्रधान इमरान खानचा थयथयाट
  • काश्मीरमुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास भारत जबाबदार
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही हिटलरच्या नाझी पक्षाप्रमाणे
  • आरएसएस नावाचा जीन आता बाटलीतून बाहेर आला आहे
  • भारताच्या ईटचा जवाब पत्थर से देंगे - इमरान खानची धमकी

मुज्जफराबाद :  पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान इमरान खान यांनी पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादचा दौरा केला. त्यावेळी तेथील लोकांना संबोधित केले. जम्मू-काश्मीरातून कलम ३७० हटविल्यानंतर आणि राज्याचे पुनर्रचना केल्यामुळे गोंधळलेल्या इमरान खान यांनी म्हटल की जर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी ही भारताची असणार आहे. 

इमरान खान यांनी म्हटले की, भाजपचे लोक हे आजारी मानसिकतेचे आहे. तसेच त्यांच्या मनात द्वेष कुटून भरला आहे. भारत एक सहिष्णू समाज समजला जात होता. पण आता जे त्यांनी त्या ठिकाणी केले आहे. त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागणार आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. आज जज पण घाबरलेले आहेत, ती (भाजप) मीडियाला कंट्रोल करत आहे. 

इमरान खान यांनी पुढे सांगितले की, जर एखादा मुसलमान आपला आवाज उठवतो, तर त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगितले जाते. भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत. आरएसएसचा जीन हा बाटलीतून बाहेर आलेला आहे. त्याला ते पुन्हा बाटली बंदही करत नाही आहेत. 

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला विसरले नाही. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरबाबत निर्णय घेऊन रणनैतिक चूक केली आहे.  मी नरेंद्र मोदींना या ठिकाणाहून सांगू इच्छीतो की हम ईट का जवाब पत्थर से देंगे.  पाकिस्तान लष्कर पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तान लष्करच नाही तर पाकिस्तान जनताही युद्धासाठी तयार आहे. 

त्यांनी काश्मीरात असं करून काय मिळवले. त्यांनी काश्मिरात सैन्य घुसवले, पर्यटकांना बाहेर काढले. तेथील नागरिकांवर कर्फ्यू लादला. त्यांनी रणनैतिक चूक केली आहे. त्यांनी त्यांचे फायनल कार्ड खेळले आहे. पण हे त्यांना खूप महागात पडणार आहे, असे त्यांनी पाकव्याप्त काश्मिरातील विधानसभेत पाकिस्तानच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी बोलताना भारताला धमकी दिली आहे. 

पाकव्याप्त काश्मिरातील मुज्जफराबाद येथे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. 

इमरान खान काय बोलले काश्मीरबाबत

काश्मीरातून कलम ३७० हटविल्याबाबत बोलताना इमरान खान म्हणाले,  भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या वचनानंतर काश्मीरचा आता विश्वासघात करण्यात आला आहे. त्यांना मानवाधिकाराचे काही घेणे-देणे नाही. आंतरराष्ट्रीय करार किंवा सिमला कराराचे काही घेणे देणे नाही आहे. त्यांची हिटलरसारखी नाझी विचारसरणी त्यांची असल्याने ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

आज सर्व जगाचे लक्ष काश्मीरकडे आहे आणि मी काश्मीरचा अॅम्बेसेडर होणार आहे. याविरूद्ध आवाज उठविणार असल्याचे इमरान खान यांनी यावेळी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाक व्याप्त काश्मिरातून इमरान खानची भारताला युद्धाची धमकी Description: गोंधळलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारताची असणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता