नवी दिल्ली : देशात जागोजागी धार्मिक (Religious) वाद उफाळून येऊ लागले आहेत. तर एकीकडे भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे, राज्यातही भोंग्यांचाही मोठा आवाज होण्याची शक्यता आहे. देशातील प्रत्येक राज्यात द्वेषाने डोकं वर काढलं असताना हिंदू महापंचायतीमध्ये यती नरसिंहानंद यांनी परत एक वादग्रस्त विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम व्यक्ती पंतप्रधान झाला तर वीस वर्षात ५० टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल, असं विधान त्यांनी केलं आहे. गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात.
हिंदू महापंचायतीमध्ये हे विधान करुन त्यांनी परत एक वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान आयोजित करण्यात आलेली हिंदू महापंचायतीला दिल्ली प्रशासनाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. यात बोलताना नरसिंहानंद यांनी हिंदूना त्यांचे अस्तित्व वाचविण्यासाठी कथिपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहनही केले. ही महापंचायत बुराडी मैदानावर ज्या संघटनेने आयोजित केली होती. त्याच संघटनेने यापूर्वी हरिद्वार आणि दिल्लीच्या जंतरमंतरवरही अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हाही तेथे कथित मुस्लीम विरोधी घोषणाबाजीही झाली होती.
बुराडी मैदानावर रविवारी आयोजित या कार्यक्रमात हिंदू श्रेष्ठत्वाची भावना असलेले अनेक नेते सामील झाले होते. नरसिंहानंद हरिद्वारच्या घटनेप्रकरणी सध्या जामिनावर आहेत.
ते म्हणाले वर्ष २०२९ किंवा २०३४ मध्ये अथवा २०३९ मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या २० वर्षात ५० टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल. ४० टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले १० टक्के निर्वासितांच्या शिबिरात आपलं जीवन काढतील.