[VIDEO] जर पाकिस्तानने दहशतवाद रोखला नाही तर, त्यांचे तुकडे-तुकडे होतील: राजनाथ सिंह

Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानवर जबरदस्त हल्लाबोल केला. पाकिस्तानने जर दहशतवादाला खतपाणी देणं सोडलं नाही तर त्यांचे तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

Rajnath Singh_twiiter
दहशतवाद रोखला नाही तर, पाकचे तुकडे-तुकडे होतील: राजनाथ सिंह  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दहशतवादाच्या मुद्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावलं
  • 'पाकिस्तानने दहशतवाद रोखला नाही तर त्यांचे दोन तुकडे होणं अटक'
  • 'भारतातील अल्पसंख्यांक सुरक्षित होते, सुरक्षित आहेत आणि सुरक्षित राहतील'

सूरत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकिस्तानला इशारा देत असं म्हटलं आहे की, 'जर पाकिस्तानने दहशतवाद रोखला नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि त्यांचे तुकडे-तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.' सूरतमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह असं म्हणाले की, 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अल्पसंख्यांकांची संख्या बरीच वाढली. पण पाकिस्तानमध्ये शिख, बौद्ध आणि इतर जातीच्या लोकांच्या मानवाधिकाराचे हनन होत असल्याची प्रकरणं सतत वाढत आहेत.' 

पाकिस्तानवर निशाणा साधत राजनाथ सिंह यांनी असं म्हटलं की, 'भारताने आजवर कधीही जात आणि धर्म यांच्या बाबतच्या राजकारणावर विश्वास ठेवला नाही. भारत कायमच न्याय आणि मानवता अशा प्रकारच्या राजकारणावरच विश्वास ठेवत आला आहे. धर्माच्याच राजकारणावर यांनी भारताचे दोन तुकडे केले आणि भारत-पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. पण आपण पाहत आहात की, धर्माच्या आधारावर जो पाकिस्तान निर्माण झाला होता त्याचे १९७१ मध्ये दोन तुकडे झाले. जर पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारचं राजकारण सुरु राहिलं तर पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही.' 

याचवेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची परिस्थिती अधोरेखित करुन सांगितली. याबाबत ते असं म्हणाले की, 'अशा प्रकारच्या राजकारणामुळे कुणालाही पाकिस्तानला तोडावं लागणार नाही. तर पाकिस्तानचे आपोआपच तुकडे-तुकडे होतील. भारतापासून वेगळं झाल्यानंतर त्यांचे १९७१ मध्ये दोन तुकडे झाले. ज्याप्रमाणे तिथे  अल्पसंख्यांक समाजासोबत, बलूचींसोबत, सिंधी समाजासोबत आणि पख्तूनोंसोबत वागत आहेत त्यावरुन असं वाटतं की, पाकिस्तानचे कधी तुकडे होतील हे त्यांना देखील कळणार नाही.' 

दरम्यान, आतंरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान सतत काश्मीरचा मुद्दा  उपस्थित करत आहे. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, 'पाकिस्तान काश्मीरबाबत जे बोलत आहे त्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणीही त्यांच्याकडे लक्ष देण्यास इच्छुक नाही. जो पाकिस्तान आपल्या देशात अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरविण्यात सक्षम नाही ते आता मानवाधिकाराबाबत बोलत आहेत. जर कुठे मानवाधिकारांचं उल्लंघन होत असेल तर ते पाकिस्तानमध्ये होत आहे. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित होते, सुरक्षित आहेत आणि सुरक्षितच राहतील.' असं म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर थेट हल्लाबोल केला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...