'त्यांची' सहमती असल्यास शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार, ममता बॅनर्जींच्या बैठकीला 17 पक्षांची हजेरी

Presidential Election 2022 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत विरोधकांमध्ये एकजूट झाली आहे. यावेळी जवळपास सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.

If 'they' agree, then Sharad Pawar's presidential candidate, Mamata Banerjee's meeting will be attended by 17 parties
'त्यांची' सहमती असल्यास शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार, ममता बॅनर्जींच्या बैठकीला 17 पक्षांची हजेरी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची एकजुट
  • ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीस विरोध पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती
  • विरोधकांनी संयुक्त उमेदवार देण्याची घोषणा केली

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीबाबत विरोधकांमध्ये एकजूट झाली आहे. बुधवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जवळपास सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. विरोधकांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली तर बरे होईल, असे म्हटले आहे. अन्यथा एकत्रित उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाईल. (If 'they' agree, then Sharad Pawar's presidential candidate, Mamata Banerjee's meeting will be attended by 17 parties)

अधिक वाचा : 

Lawrence Bishnoi: डी कंपनीसारखा बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा - महाराष्ट्र गृह मंत्रालयाचा खुलासा

18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. एनडीएच्या विरोधात विरोधी पक्ष संयुक्त उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत. या बैठकीसाठी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 19 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

विरोधकांच्या बैठकीत हे नेते आले

या बैठकीला काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव, शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी आणि सुभाष देसाई, आरजेडीकडून मनोज झा, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती उपस्थित होते. पीडीपी, डीएमकेकडून कुमार बाळू, सीपीएमकडून एलराम करीम, सीपीआयकडून बिनॉय विश्वम, एचडी देवेगौडा, क्रांतिकारी समाजवादी पक्षाकडून एनके प्रेमचंद्रन आले आहेत.

केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्यावतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा : 

Nupur Sharma Controversy: खासदार गौतम गंभीरवर स्वरा भास्करनं वाढवला 'स्वर', म्हणाली त्यांना बुलडोझरचा आवाज नाही येत पण..

उमेदवारीसाठी या तीन नावांचा विचार

विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांचे नाव सर्वात आधी आले होते, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी  दोन नावे सुचवली आहेत. त्यापैकी एकाचे नाव गोपाळ कृष्ण गांधी आणि दुसऱ्याचे नाव फारुख अब्दुल्ला आहे. याशिवाय एनके प्रेमचंद्रन यांचेही नाव इतरांनी सुचवले होते. आठवडाभरात या विषयावर दुसरी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत संयुक्त उमेदवाराचे नाव निवडले जाऊ शकते. TMC प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सर्व विरोधी पक्षांना सोबत घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अधिक वाचा : 

Ruckus in Bihar: अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये मोठा गोंधळ; विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको, ट्रेनवर दगडफेक 

बहुतेक पक्ष बैठकीपासून दूर

बैठकीत विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, मात्र अनेक विरोधी पक्ष बैठकीपासून दूर राहिले. तेही विरोधी पक्ष जे कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेत आहेत. उदाहरणार्थ, आम आदमी पक्ष ज्याची दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारे आहेत. ओडिशाचा सत्ताधारी पक्ष बीजेडी, तेलंगणाचा सत्ताधारी पक्ष टीआरएस, आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस. याशिवाय शिरोमणी अकाली दल, बसपा, एआयएमआयएम आणि टीडीपीही ममतांच्या बैठकीपासून दूर राहिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी