रेस्टॉरंटमध्ये जेवायचंय तर आधी भिंत चाटा

If you want to eat in a restaurant, first lick the wall : अमेरिकेत असे एक रेस्टॉरंट आहे जिथले पदार्थ खाणे खवय्यांना प्रचंड आवडते. पण या रेस्टॉरंटची एक अनोखी अट आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणताही पदार्थ खायचा असेल तर आधी तिथेच एका भागात असलेली छोटी भिंत चाखावी लागते.

If you want to eat in a restaurant, first lick the wall
रेस्टॉरंटमध्ये जेवायचंय तर आधी भिंत चाटा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रेस्टॉरंटमध्ये जेवायचंय तर आधी भिंत चाटा
  • रेस्टॉरंटची अनोखी अट
  • रेस्टॉरंटमध्ये येणारे खवय्ये आधी भिंत चाखून नंतर जेवणे पसंत करतात

If you want to eat in a restaurant, first lick the wall : खवय्यांना चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला आवडते. अमेरिकेत असे एक रेस्टॉरंट आहे जिथले पदार्थ खाणे खवय्यांना प्रचंड आवडते. पण या रेस्टॉरंटची एक अनोखी अट आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणताही पदार्थ खायचा असेल तर आधी तिथेच एका भागात असलेली छोटी भिंत चाखावी लागते. ही अट पूर्ण केल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये रुचकर पदार्थ खाता येतात.

ऐकायला एकदम विचित्र वाटेल. पण रेस्टॉरंटची ही अट पूर्ण करून नंतर तिथल्या पदार्थांची चव चाखणे अनेक खवय्यांना आवडते. तुम्ही म्हणाल, पदार्थ खाण्यासाठी आधी भिंत चाखण्याची अट का... तर या प्रश्नाचे उत्तर या भिंतीतच आहे. 

हॉटेलमधली जिभेने चाटण्याची भिंत हिमालयात आढळणाऱ्या गुलाबी मीठापासून तयार केली आहे. अमेरिकेतील मिशन रेस्टॉरंटसाठी (The Mission) ही भिंत त्यांच्या मुख्य शेफने १७ वर्षांपूर्वी आणली. भिंतीसाठी वापरलेल्या मीठाची चव आजही लोकांना आवडते. दररोज ही भिंत कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ केली जाते. या भिंतींचे मीठ चाखले तर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. यामुळेच अमेरिकेतील स्कॉट्सडेल (Old town Scottsdale) येथे असलेल्या मिशन रेस्टॉरंटमध्ये भिंत चाखण्यासाठी आणि नंतर रुचकर पदार्थ खाण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण येतात. भिंत चाखण्याची अट असूनही मिशन रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली नाही. उलट मिशन रेस्टॉरंटची लोकप्रियता वाढत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी